नुपूर शर्मा यांना प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सतत धमक्याही मिळत आहेत. याप्रकरणी आता काश्मीर खोऱ्यातील युट्युबर फैजल वाणीने नुपूर शर्मांबद्दल एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, वाद वाढल्यानंतर फैजलने तो व्हिडिओ काढून टाकला. या व्हिडिओनंतर फैजलला अटक करण्यात आली असून त्याने माफीही मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फैजल वाणी पोलिसांच्या रडारवर

नुपूर शर्मांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ यूट्यूबर अपलोड केल्यानंतर फैजल वाणी पोलिसांच्या रडारवर आला. पोलिसांनी फैजलला अटक केली आहे. कारवाईनंतर घाबरलेल्या फैजलने तत्काळ माफी मागितली. आपल्या स्पष्टीकरणात फैसलने सांगितले की, चुकून त्याने हा व्हिडिओ बनवला आणि माझ्यामुळे जर कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करा, असेही फैजल म्हणाला.

कोण आहे फैजल?

फैसल वानी यूट्यूबवर डीप पेन फिटनेस नावाचे यूट्यूब चॅनल चालवतो. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ज्ञान, मनोरंजन, फिटनेस आणि इतर संदेशांचे व्हिडिओ बनवतो. फैझल वानी याने जून २०२० मध्ये हे यूट्यूब चॅनल सुरू केले. याशिवाय फैसल वाणी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही सक्रिय असून त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. नुपूर शर्मांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फैसल अडचणीत आला होता, त्यामुळे त्याने तातडीने हा व्हिडिओ काढून टाकला आहे.