कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केल्यापासून संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. कठुआमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर मंदिर परिसरातच सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यातच आली. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची भीषणता समाजासमोर आली आणि अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध करताना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

अशा भयानक गुन्ह्यातील आरोपींचा कोण कसा काय बचाव करु शकतो ? कठुआमध्ये त्या मुलीबरोबर जे घडले तो मानवतेच्या विरोधातील गुन्हा आहे. दोषींना शिक्षा ही झालीच पाहिजे असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Story img Loader