Vladimir Putin apologised for Azerbaijan Plane Crash : ख्रिसमसच्या दिवशी बाकूहून चेचन्यातील ग्रोझनी या रशियन शहराकडे उड्डाण करणारे अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ नियोजित मार्गावरून भटकले आणि क्रॅश झाले होते. या दुर्घटनेत ३८ लोकांनी जीव गमवावा लागला होता. दरम्यान आता रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी या दुर्घटनेबद्दल माफी मागितली आहे. रशियाने या विमान दुर्घटनेचे खरे कारण उघड करत, आम्ही युक्रेनचे ड्रोन हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न करत होतो असे सांगितले आहे.

“अझरबैजानचे प्रवासी विमान जे आपल्या नियोजित वेळेनुसार प्रवास करत होते, या विमानाकडून ग्रोझनी विमानतळावर उतरण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. त्याच वेळी ग्रोझनी, मॉजडॉक आणि व्लादिकाव्काझ यांच्यावर युक्रेनच्या मानवरहित एरिअल व्हेकल्सनी हल्ला केला होता आणि रशियन हवाई संरक्षण यंत्रणांनी हे हल्ले परतवून लावले”, अशी माहिती रशियाच्या सरकारने दिली आहे.

The Aga Khan spiritual leader of Ismaili Muslims, dies aged 88
आगा खान यांचे निधन; इस्माइली मुस्लिमांचे ६८ वर्षे आध्यात्मिक नेतृत्व
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Washington DC Plane Crash USA
US Plane Crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक, ३० मृतदेह सापडले
South Sudan Plane Crash
Plane Crash : दक्षिण सुदानमध्ये भीषण विमान अपघात, २१ जणांपैकी फक्त एकजण वाचला; मृतांमध्ये भारतीय नागरिकाचाही समावेश
Uzbekistan Chess Player refuses to shake hands with Vaishali on religious grounds Later Apologizes
धार्मिक कारणांमुळे वैशालीशी हात मिळवला नाही; उझबेकिस्तानच्या ग्रँड मास्टरचा खुलासा
Russia-Ukraine war Putin Trump
Vladimir Putin: ‘ट्रम्प २०२० साली हरले नसते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं मोठं विधान
russia ukraine war
Russia Ukraine War : युद्ध थांबविण्यासाठी झेलेन्स्की तयार
trump warns Russia marathi news
Donald Trump : रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी या घटनेबद्दल अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव ( Ilham Aliyev) यांची माफी मागितली आहे. ज्यामध्ये क्रेमलिनने रशियन हवाई क्षेत्रात घडलेली ही ‘दुःखद घटना’ असल्याचे म्हटले आहे.

“व्लादिमीर पुतिन यांनी रशियन हवाई क्षेत्रात घडलेल्या दु:खद घटनेसाठी माफी मागीतली आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला तसेच जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे”, क्रेमलिनने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. रशियन सरकारने या विमान दुर्घटनेवर भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अपघाताच्या मुद्द्यावर युक्रेन आणि अमेरिकेकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते.

हेही वाचा>> South Korea Plane Crash : दक्षिण कोरियात मोठी दुर्घटना; लँडिंगवेळी विमान क्रॅश झाल्याने विमानाचा स्फोट, ४७ जणांचा मृत्यू

दरम्यान अझरबैजानच्या अध्यक्षीय कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अझरबैजानचे अध्यक्ष अलीयेव यांनी पुतिन यांच्याशी झालेल्या संभाषणात विमानबरोबर रशियन हवाई क्षेत्रात बाह्य फिजिकल आणि टेक्निकल हस्तक्षेप झाला होता, ज्यामुळे विमान अनियंत्रित झाले आणि त्याला कझाकस्तानमधील अकताऊ शहराकडे वळावे लागले असे म्हटले आहे.

नेमकं काय झालं होतं?

या विमान दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील चालक दलासह ६७ जणांपैकी ३८ जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी (२५ डिसेंबर) अझरबैजान एअरलाइन्सचे फ्लाइट ‘J2-8243’ विमानाने अझरबैजानची राजधानी बाकू येथून ३.५५ वाजता उड्डाण केले. त्यानंतर ६.२८ च्या सुमारास ते क्रॅश झाले, असे फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट ‘Flightradar24’ मधील डेटा दर्शवितो. फ्लाइट रडार वेबसाइटवरील आपल्या सामान्य मार्गापासून हे विमान भटकले आणि कॅस्पियन समुद्र ओलांडून समुद्राच्या पूर्वेकडच्या किनाऱ्यावरील तेल आणि वायू केंद्र असलेल्या अकताऊजवळ क्रॅश झाले होते.

Story img Loader