महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शिवभक्तांसाठी एका आनंदाची बातमी समोर आली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे ६ मे २०२२ रोजी सकाळी ६.२५ वाजता भाविकांसाठी खुले होणार आहेत. आज (मंगळवार) महाशिवरात्रीनिमित्त पारंपारिक पूजापाठानंतर केंदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे पीआरओ डॉ. हरीश गौर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, उखीमठाहून केदारनाथ उत्सव यात्रा २ मे रोजी केदारनाथला निघणार आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे रोजी उघडतील.

उखीमठ येथून ठरलेल्या वेळापत्रकानुसार भगवान श्री केदारनाथांची पंचमुखी उत्सव डोली २ मे रोजी पंचकेदार गद्दी येथील ओंकारेश्वर मंदिरातून केदारनाथसाठी निघेल. उखीमठ येथे भैरव पूजन एक दिवस आधी म्हणजेच १ मे रोजी होणार आहे. डोली २ मे रोजी गुप्तकाशी, ३ मे रोजी फाटा, ४ मे रोजी गौरीकुंड आणि ५ मे रोजी केदारनाथ धाम येथे पंचमुखी डोली पोहोचेल. त्यानंतर शुक्रवार, ६ मे रोजी सकाळी ६.२५ वाजता केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील. मंगळवारी शिवरात्रीनिमित्त सकाळी ही घोषणा करण्यात आली आहे.