हिंदूंनी (Hindu) घरामध्ये शस्त्रं (Weapons) बाळगली पाहिजेत किंवा धारदार सुऱ्या (Knives) तरी सोबत बाळगल्या पाहिजेत असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी केलं आहे. कर्नाटकात हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येविषयी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखंच उत्तर दिलं पाहिजे. आपल्या घरात हिंदूंनी शस्त्र बाळगलीच पाहिजेत असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी?
लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखंच उत्तर दिलं पाहिजे. आपल्या मुलींवर संस्कार घडवा. आपल्या मुलींना गोष्टी समजावून सांगा. एवढंच नाही तर हिंदूंनी आपल्या घरांमध्ये हत्यारं बाळगली पाहिजेत. काहीही नसेल तर भाजी कापण्याच्या सुरीला धार लावून घ्या. स्पष्टच सांगते आहे की आपल्या घरातले चाकू, सुरे जे आपण भाजी कापायला वापरतो ते धारदार असले पाहिजेत. त्यांनी चाकू भोसकून आपल्या हर्षावर हल्ला केला. त्यांनी चाकू सुऱ्यांनी भोसकून बजरंग दल, भाजपा, भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा जीव घेतला आहे. आता शस्त्रांना धार करण्याची वेळ आपली आहे. माहित नाही कधी आवश्यकता भासेल. जर आपल्या घरातली भाजी व्यवस्थित कापली गेली तर आपल्या शत्रूची जीभ आणि त्याचं शीरही आपल्याला प्रसंगी कापता येईल.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या भाषणात शिवमोगा येथील हर्षासह हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनांकडेही आपल्या भाषणांत लक्ष वेधलं. आपलं रक्षण करायचं असेल तर हिंदूंनी घरात सुरी किंवा चाकू बाळगलेच पाहिजेत. आज भाजी कापण्यासाठी वापरली जाणारी ही साधनं उद्या शत्रूला उत्तर द्यायला कामी येतील असंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.आपल्या घरात घुसून कुणी हल्ला केला तर त्याला जशास तसं उत्तर देणं हा आपला अधिकार आहे असंही प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.

हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. Love Jihad सारख्या घटना घडतात त्याला जशास तसं उत्तर द्या. त्यांच्याकडे (मुस्लिम समाज) जिहादची परंपरा आहे. त्यामुळेच ते लव्ह जिहाद करतात. प्रेम असलं तरीही ते त्यातही ते जिहाद करतात. आपण (हिंदू) सुद्धा प्रेम करतो, आपण देवावर प्रेम करतो. प्रेम ही आपल्यासाठी चांगली भावना आहे असंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.