लंडन : ब्रिटनमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीमध्ये मजूर पक्षाने (लेबर पार्टी) ६५० सदस्यीय कनिष्ठ सभागृहामध्ये ४१२ जागांवर विजय मिळवत तब्बल १४ वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ हुजूर पक्षाचा (कॉन्झर्व्हेटिव्ह) ऐतिहासिक दारुण पराभव झाला. मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनतील.

सुनक यांच्या पक्षाचा पराभव इतका मोठा असेल याचा फारसा अंदाज नव्हता. सत्ताधारी हुजूर पक्षाला १२१ जागा मिळाल्या असून आधुनिक ब्रिटनच्या इतिहासातील ही या पक्षाची सर्वांत वाईट कामगिरी ठरली. हुजूर पक्षाच्या २५० जागा कमी झाल्या आहेत. मजूर पक्षाने नेत्रदीपक कामगिरी बजावताना २११ जास्त जागा अधिक मिळवल्या आहेत. लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने ७१ जागा मिळवल्या. आता त्यांचे ६३ खासदार अधिक असतील. हुजूर मंत्रिमंडळातील अनेक बड्या मंत्र्यांचा पराभव झाला. माजी पंतप्रधान लिझ ट्रस याही पराभूत झाल्या. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना दोन्ही उमेदवार भेटले. सुनक यांनी पराभव मान्य केला असून, नवे सरकार स्थापण्यासाठी स्टार्मर यांना आमंत्रण दिले जाईल.

Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
British Indians stripped of honours by the UK Crown
हिंदूंची बाजू घेतल्याने अन् मोदींचे समर्थन केल्याने किंग चार्ल्स यांनी दोन ब्रिटीश भारतीयांना दिलेला सन्मान परत घेतला; प्रकरण काय?
cm Eknath Shindes promise to make Mumbais roads pothole free in two years vanished
मतदान यंत्रांमध्ये फेरफार नसल्याचे शपथ घेणाऱ्या विरोधकांना पटले का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
deputy chief minister position does not exist in constitution but post not unconstitutional
 ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून शपथ घेता येते का?
French prime minister Michel Barnier
फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा; उजव्याडाव्यांनी एकत्र येऊन सरकार पाडल्यानंतर मोठा राजकीय पेच

ब्रिटनमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कनिष्ठ सभागृहात किंवा हाउस ऑफ कॉमन्समध्ये किमान ३२६ जागा मिळवणे आवश्यक होते. तो आकडा मजूर पक्षाने अगदी आरामात पार केला. नवीन पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दिलेल्या ‘राष्ट्रीय नूतनीकरणा’च्या घोषणेला ब्रिटनच्या जनतेने भरभरून पाठिंबा दिल्याचे या निकालातून दिसते. आता बदलाला सुरुवात झाली आहे असे मत स्टार्मर यांनी निकालानंतर केलेल्या पहिल्या भाषणात व्यक्त केले. दरम्यान, सुनक यांनी उत्तर इंग्लंडमधील रिचमंड अँड नॉर्थआलर्टन या मतदारसंघात विजय मिळवला.

हेही वाचा >>> UK elections 2024 : ऋषी सुनक ते प्रीती पटेल; या भारतीय वंशाच्या पुढाऱ्यांचा निवडणुकीत विजय

हुजूर पक्षाचा पराभव का?

गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल तीन पंतप्रधान देणाऱ्या हुजूर पक्षाच्या कार्यकाळात ब्रिटनच्या जनतेचे राहणीमान घसरले. सर्वसामान्य ब्रिटिश नागरिकांना किफायतशीर दरात उत्तम आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ची (एनएचएस) वाताहत झाली असून, डॉक्टरांच्या भेटीची वेळ मिळवण्यासाठी कित्येक महिने रखडावे लागत आहे. सत्ता सोडताना, नागरिकांचे जीवनमान खालावण्याची कामगिरी करणारा हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील पहिला पक्ष ठरला आहे.

मजूर पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे आणि मी सर कीर स्टार्मर यांचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. आमच्या पक्षाचा पराभव झाला आहे आणि मी त्याची जबाबदारी स्वीकारतो. – ऋषी सुनक, नेते, हुजूर पक्ष

बॉक्स –

नवीन सभागृहात

मजूर – ४१२

हुजूर – १२१

लिबरल डेमोक्रॅट्स – ७१

एसएनपी – ९

एसएफ – ७

इतर – २८

मोदींकडून स्टार्मर यांचे अभिनंदन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नियोजित पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारी अधिक मजबूत होण्यासाठी सकारात्मक आणि रचनात्मक भागीदारीची आपल्याला आशा आहे असे मोदी यावेळी म्हणाले. तसेच, मोदी यांनी मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वगुणांचीही प्रशंसा केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

आता बदलाला सुरुवात होत आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर यामुळे बरे वाटत आहे. अशा निकालाबरोबर मोठी जबाबदारीही येते. आम्हाला आपला देश एकसंध ठेवण्यासाठी कल्पनांचे नूतनीकरण करावे लागणार आहे. राष्ट्रीय नूतनीकरण. तुम्ही कोणीही असा, कुठूनही सुरुवात करा, जर तुम्ही कठोर परिश्रम केले, नियमांचे पालन केले तर हा देश तुम्हाला समान संधी देईल. – कीर स्टार्मर, नेते, मजूर पक्ष

Story img Loader