इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे कार्यकर्ते व नवीन राजकीय पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे अमेरिकेचे हस्तक आहेत, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केला. परिवर्तन रॅलीत ते म्हणाले की, केजरीवाल हे स्वयंसेवी संस्थेच्या नावाखाली अमेरिकेचे हस्तक म्हणून काम करीत आहेत. केजरीवाल व भाजप अध्यक्ष नितीन गडकरी हे मनोरुग्ण असून त्यांना बरे करण्यासाठी रामदेव यांच्या योग शिबिरात पाठवले पाहिजे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे धर्मनिरपेक्ष नेते असल्याचा खोटा देखावा तयार करीत आहेत. माझ्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर ते आता संघाच्या मांडीवर बसले आहेत, असे ते म्हणाले.

Story img Loader