दिल्ली विधानसभेसाठी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला आता रंग चढू लागला आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या नेत्या आणि केजरीवालांच्या पूर्वाश्रमीच्या सहकारी किरण बेदी आणि काँग्रेस नेते अजय माकन यांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज भरले.
बेदी व माकन यांनी समर्थकांच्या गराडय़ात वाजतगाजत मिरवणुका काढून अर्ज भरले तर केजरीवाल यांनी साधेपणाने थेट निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज भरला. काल निवडणूक कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने केजरीवाल यांनी अर्ज भरणे पुढे ढकलले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा