दिल्ली विधानसभेत मोठे यश मिळविल्यानंतर ‘आप’ने राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवारांची यादी पुढील दोन आठवड्यांत जाहीर करण्यात येईल, असे ‘आप’च्या नेत्याने सांगितले आहे.
‘आप’च्या राष्ट्रीय संसदीय समितीची आज बैठक होत असून, यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे. दिल्लीत ‘आप’ने बहुमत सिद्ध केल्यानंतर,  या सरकारने एक आठवडा पूर्ण केला आहे.  सूत्रांनी आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या पदासाठी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा चांगले पर्याय असणे देशासाठी आवश्यक आहे.