आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी रामलीला मैदानावर शपथ घेतल्यानंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपानुसार नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःकडे उर्जा, अर्थ, गृह, नियोजन, उच्च शिक्षण आणि सेवा-दक्षता ही खाती ठेवली आहेत.
 मनीष सिसोदिया यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि नागरी विकास या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  सौरभ भारद्वाज यांच्याकडे अन्नपुरवठा आणि परिवहन या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सत्येंद्र जैन यांच्याकडे आरोग्य आणि उद्योग मंत्रालय सोपवण्यात आले आहे. या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री राखी बिर्ला यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खाती तर, गिरीश सोनी यांच्याकडे समाजकल्याण खाते सोपवण्यात आले आहे. सोमनाथ भारती यांच्याकडे विधी, पर्यटन, प्रशासकीय सुधारणा तसंच कला आणि संस्कृती मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय.