विधानसभेत जनलोकपाल संमत झाले नाही तर राजीनामा देण्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. या मुद्दय़ावर कोणत्याही थराला जाऊ, असा इशारा यापूर्वीच केजरीवाल यांनी दिला आहे. हे विधेयक संमत झाले नाही तर आपल्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले. या विधेयकाला दिल्ली सरकारला पाठिंबा देणारा काँग्रेस, त्याचबरोबर भाजपने विरोध केला आहे. देशातील भ्रष्टाचार घालवण्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा शंभर वेळा त्याग करू, असे केजरीवाल यांनी स्पष्ट
केले. ही विधेयके दिल्ली विधानसभेत १३ फेब्रुवारीला मांडली जाणार आहेत. स्थानिक पातळीवर भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वराज विधेयकात लोकांच्या हाती थेट सत्ता देण्याची तरतूद आहे.केजरीवाल यांची ही धमकी म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्याची खेळी असल्याची प्रतिक्रिया दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदसिंग लवली यांनी दिली. सदनात काँग्रेस जनलोकपालला पाठिंबा देईल असे त्यांनी जाहीर केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा