नैसर्गिक वायू किंमतीच्या मुद्यावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी गप्प का ? असा प्रश्न आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी टि्वटरवर केला आहे. तसेच, आजच्या रॅलीत मोदींनी नैसर्गिक वायुच्या किंमतीसंदर्भातील मौन सोडावे, अशी मागणीही त्यांनी टि्वटरद्वारे केली.
गॅसच्या किंमती वाढवण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी रिलायन्सला मदत का करत आहेत? काँग्रेस हे अंबानींचे ‘दुकान’ आहे का?असे केजरीवालांनी म्हटले आहे. तसेच, यंदाची लोकसभा निवडणूक आम आदमी पार्टी विरुद्ध मुकेश अंबानी, अशीच होणार का? आणि त्यात राहुल गांधी, नरेंद्र मोदी हे अंबानींचे एजंट म्हणून काम करणार का? असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी आज काँग्रेस, भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
जनलोकपाल विधेयकावरुन दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल यांनी मागच्या आठवडयात भ्रष्टाचार विरोधी पथकाला रिलायन्स इडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्या विरोधात प्राथमिक तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा