Kerala Actress : मॉलिवूड अर्थात मल्याळम सिनेसृष्टीतील सेक्स स्कँडल आणि मीटूची प्रकरणं ही रोज नव्याने समोर येत आहेत. हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर सुरु झालेली आरोपांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. आता एका दिग्दर्शकावर केरळमधल्या अभिनेत्रीने आरोप केला आहे. मला त्या दिग्दर्शकाने ‘सेक्स स्लेव्ह’ बनवलं असा आरोप या अभिनेत्रीने ( Kerala Actress ) केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझ्या आई वडिलांना सिनेसृष्टीबाबत काही माहीत नव्हतं

मी त्यावेळी १८ वर्षांची होते, अगदीच नवखी होते. माझं महाविद्यालयीन शिक्षण सुरु होतं. मी एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी होते. माझ्या आई वडिलांना सिनेमा, सिनेसृष्टी याबाबत नीटसं माहीतही नव्हतं. मला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली कारण मी महाविद्यालयात नाटकांमध्ये काम करत होते. अभिनेत्री रेवती यांचा माझ्या आयुष्यावर लहानपणापासून प्रभाव होता. त्यांचे चित्रपट मी पाहिले होते. तसंच आम्ही जिथे राहात होतो त्याच परिसरात रेवती यांचंही घर होतं. असं या अभिनेत्रीने ( Kerala Actress ) सांगितलं

सगळ्यांसमोर तो म्हणायचा तू मुलीसारखी आहेस आणि..

अभिनेत्री ( Kerala Actress ) म्हणाली, तामिळ सिनेसृष्टीत काम करणाऱ्या दिग्दर्शकाने माझा लैंगिक छळ केला. मला त्याने सुरुवातीला सांगितलं की तू माझ्या मुलीसारखी आहेस. मात्र नंतर त्याने माझं शोषण करण्यास सुरुवात केली. मी १८ वर्षांची होते तेव्हा मला लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. तो माझा पहिला तामिळ चित्रपट होता. तो दिग्दर्शक माझ्यावर दबाव आणत होता, त्याने माझं शोषण केलं. त्याने त्याच्या पत्नीशी माझी ओळख करुन दिली आणि सांगितलं ही आपल्या सिनेमातली मुख्य अभिनेत्री असेल ही तर मला अगदी मुलीसारखी आहे. मात्र नंतर त्याच्यातला हैवान जागा झाला. त्याने वर्षभर माझ्यावर बलात्कार केला. असा गंभीर आरोप या अभिनेत्रीने केला आहे. एनडीटीव्हीला या अभिनेत्रीने मुलाखत दिली. त्यावेळी हा गंभीर आरोप तिने केला आहे.

हे पण वाचा- Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन

दिग्दर्शकाचं नाव मी जाहीर करणार

या अभिनेत्रीने ( Kerala Actress ) पुढे सांगितलं की या प्रकरणातला जो दिग्दर्शक आहे त्याचं नाव मी सरकारच्या विशेष तपास समितीपुढे (SIT) मांडणार आहे. ज्याने माझं शोषण केलं तो दिग्दर्शक आणि त्याची पत्नी दोघंही माझ्याशी चांगलं वागायचे, मला लागतील तेव्हा पैसे द्यायचे, चांगलं खायला द्यायचे, मिल्कशेक, आईस्क्रीम्स मागवायचे. ही सगळी सुरुवातीची प्रक्रिया होती. एक दिवस असा आला की दिग्दर्शक माझ्या जवळ आला त्याने माझं चुंबन घेतलं. मी त्या प्रसंगाने पुरती बावरुन गेले. जो माणूस मला मुलगी म्हणतो, त्याने असं करावं? मी त्यावेळी जागच्या जागी थिजले होते. मी हा प्रसंग माझ्या मैत्रिणींना सांगायचा विचार करत होते पण तेव्हा मी गप्प राहिले. त्यावेळी मला वाटलं की त्यांनी हे प्रेमाखातर केलं असेल का? मी चुकीचा विचार करते आहे का? पण ते तसं नव्हतं.

बलात्कारानंतरही सांगायचा ही माझी मुलगी आहे

अभिनेत्री ( Kerala Actress ) म्हणाली, की त्या चुंबनाच्या प्रसंगानंतर माझं शोषण टप्प्याटप्प्याने सुरु झालं. माझ्या शरीराला तो सरावलेपणाने हात लावायचा, अनेकदा माझा विनयभंग करायचा, त्यानंतर त्या दिग्दर्शकाने माझ्यावर वर्षभर बलात्कार केला. एवढंच नाही तर तो निलाजरेपणाने सगळ्यांसमोर मला ही माझी मुलगी आहे, माझ्या मुलीसारखी आहे असंही सांगायचा. अशी आपबिती या केरळच्या अभिनेत्रीने सांगितली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala actress said director called her daughter and raped for year scj