Kerala Double Murder: केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील नेनमारा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंथामारा नामक आरोपी जामीनावर तुरुंगाच्या बाहेर आला होता. त्याने शेजारी राहणाऱ्या सुधाकरण (५५) आणि त्यांची आई लक्ष्मी (७५) यांचा निर्घृण खून केला. पाच वर्षांपूर्वी याच चेंथामाराने सुधाकरण यांची पत्नी सजिथा यांचा खून केला होता. या खूनाच्या गुन्ह्यात चेंथामारा तुरुंगात गेला होता. मात्र पाच वर्षांनंतर त्याल जामीन मिळताच त्याने सजिथाचा पती आणि सासूचाही खून केला. गुन्हा केल्यानंतर चेंथामारा फरार झाला होता. मात्र ३६ तासांच्या शोधानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मात्र मोठा रोष पाहायला मिळाला. संतप्त जमावाने पोलीस ठाण्याबाहेर जमून आंदोलन केले, ज्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या दोघी सोडून संपूर्ण कुटुंब संपलं

सुधाकरण, त्यांची पत्नी आणि आईचा खून झाला असला तरी त्यांची दुसरी पत्नी आणि दोन मुली मात्र सुखरुप वाचल्या आहेत. खून होण्याआधी या तिघी बाजारात गेल्यामुळे त्या वाचल्या. आता वडील आणि आजीला गमावल्यामुळे दोन्ही मुली अतिशय दुःखात आहेत. सुधाकरण यांच्या दोन्ही मुलींनी आईचा खून झाल्यानंतर चेंथामारा यांना त्यांच्या शेजारी राहण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यानंतर सोमवारी (२७ जानेवारी) जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने सुधाकरण यांचा आणि आईचा खून केला.

अखिला आणि अतुल्या या सुधाकरण यांच्या दोन्ही मुलींनी आरोपीला आता फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याने २०१९ साली आमच्या आईचा खून केला आणि आता आमच्या बाबांना, आजींनाही मारले. त्याला आता पुन्हा तुरुंगातून जामीन मिळाला तर तो असाच लोकांना मारत राहिल.

पोलिसांनी सांगितले की, चेंथामाराने आपला गुन्हा कबूल केला आहे. सुधाकरणनेच त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप चेंथामाराने केला आहे. त्याच्या पत्नीच्या खूनाचा बदला घेण्यासाठी सुधाकरणने माझ्यावर हल्ला केला, असा दावा आरोपीने केला. २०१९ च्या आधी चेंथामाराची बायको त्याला सोडून गेली होती. सुधाकरणच्या कुटुंबियांनी जादूटोणा केल्यामुळेच पत्नी सोडून गेली, असा चेंथामाराचा संशय होता. त्यामुळे त्याने सुधाकरणच्या पत्नीचा खून केला होता. आता पाच वर्षांनंतर त्याने सुधाकरण आणि त्याच्या आईलाही संपविले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala double murder accused chenthamara killed three people in fiver years police find witchcraft angle kvg