वृत्तसंस्था, तिरुवनंतपुरम : केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यात धनलाभाच्या हेतूने दोन महिलांचा बळी घेतल्याच्या आरोपाखाली तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. बळी दिलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचे मांस आरोपीने खाल्ल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार एका उपाहारगृहाचा मालक मोहम्मद शफी ऊर्फ रशीद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लैंगिक विकृतीतून त्याने आधीही काही गुन्हे केले आहेत. त्याच्यासह पारंपरिक वैद्य आणि मसाज करणारा भागवपाल सिंह आणि त्याची पत्नी लैलाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. रोझली (४९) व पद्मम (५२) या महिलांची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांना बुधवारी कोची न्यायालयाने २६ ऑक्टोबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

कोचीचे पोलीस उपायुक्त एस. शशिधरन यांनी या बेपत्ता महिलांचा तपास करताना या गुन्ह्याचा छडा लावला. शशिधरन यांनी सांगितले की, आरोपी सिंह आणि लैला यांनी पोलिसांना सांगितले की, शफीने मृत रोझलीच्या गुप्तांगाच्या मांसाला शिजवून खाल्ले. यास पुष्टी देणारे कोणतेही पुरावे किंवा इतर तपशील अद्याप मिळाले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार फक्त शफीनेच नरमांस भक्षण केले होते.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

शफी हा ‘काळी जादू’ करणारा नसून, लैंगिक विकृत व्यक्ती आहे, असे सांगून शशिधरन म्हणाले की, शफीने काळय़ा जादूचा बहाणा या प्रकरणात केला. दुसऱ्या गुन्ह्यात आपल्या विकृत हेतूपूर्तीसाठी तो इतर बहाणे वापरून महिलांना जाळय़ात ओढत असे. एका महिलेच्या नावाने केलेल्या बनावट ‘फेसबुक’ खात्याद्वारे झालेल्या संवादातून शफीला समजले की, या सिंह व लैला या दांपत्याला संपत्ती मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणून काळय़ा जादूत रस आहे. त्यानंतर त्याने या दोघांशी ओळख वाढवून त्यांच्या जादूटोण्यामधील रस वाढवला. त्यांना स्त्रियांना आणायला भाग पाडून व तांत्रिक असल्याचे भासवून त्याने काही काळय़ा जादूचे विधी करण्याचे नाटक केले.

कोचीचे पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनीही प्रसारमाध्यमांना आरोपीने रोझलीच्या मृतदेहाचे मांसभक्षण केल्याच्या माहितीला दुजोरा दिला, मात्र अद्याप पुरावे हाती नसल्याचे सांगितले. शफीवर २०२० मध्ये ७५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याप्रकरणी शफीला अटक झाली होती. या महिलेच्या गुप्तांगांवरही शफीने गंभीर जखमा केल्या होत्या. शफीच्या विकृतीला बळी पडलेल्या या प्रकरणातील दोन्ही महिला या लॉटरी विक्रेत्या होत्या. त्यांना शफीने अश्लील चित्रफितींत काम करण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवले होते.

बेपत्ता होईपर्यंत या महिला कोचीमधील शफीच्या स्वस्त उपाहारगृहात नेहमी जात होत्या. ६ जून रोजी रोझली व २६ सप्टेंबर रोजी पद्मम बेपत्ता झाल्या. एर्नाकुलममधून बेपत्ता झाल्यानंतर २४ तासांत या महिलांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पद्ममच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या तिच्या बेपत्ताप्रकरणी पोलीस तपास करत असताना हा गुन्हा उघड झाला. मूळचा तमिळनाडूतील धर्मापुरीचा असलेला पद्मम कोची येथे राहत होता. दूरध्वनींचे विश्लेषण केल्यानंतर पद्मम शफीच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना आढळले. अमली पदार्थ वाहतूक, खुनी हल्ले, बलात्कारप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल होते.

जावडेकर यांची केरळ सरकारवर टीका

माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी या महिलांच्या बळीप्रकरणी केरळमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकास्त्र सोडले. बुधवारी बोलताना त्यांनी सांगितले, की राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पथनमथिट्टा जिल्ह्यातील दोन महिलांचे बळी प्रकरण हे केवळ महिलाविरोधी नसून, त्यामागे बरेच काळेबेरे आहे. सत्ताधारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि मूलतत्त्ववादाचे समर्थक या गुन्ह्यामागे असल्याचा आरोप जावडेकर यांनी या वेळी केला.