राज्यातील सरकारी दुकानांमध्ये मॅगीच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय केरळ राज्य शासन आणि नागरी अन्न पुरवठा महामंडळाने मंगळवारी घेतला. मॅगीच्या नमुन्यात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) या हानिकारक पदार्थाचे मोठे प्रमाण आढळल्यामुळे दक्षता म्हणून केरळ राज्यशासनाने सरकारी दुकानांत मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्याचे हे पाऊल उचलले आहे. मात्र खासगी दुकाने आणि खुल्या बाजारात मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली नाही.
‘मॅगी’प्रकरणी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मॅगी संदर्भात सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत राज्यातील सरकारी दुकानांतील मॅगीच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आल्याची माहिती राज्याच्या नागरी अन्न पुरवठा मंत्रालयातील अधिकाऱयाने दिली. दरम्यान, दिल्लीत देखील मॅगीच्या नमुन्यात हानिकारक पदार्थांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.

Story img Loader