गुजरात विकासाच्या मॉडेलवरून भाजपची हवा काढून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असतानाच केरळमधील काँग्रेसप्रणीत सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहर विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराची पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
केरळ विधानसभेतील स्थानिक प्रशासन, ग्रामविकास आणि गृहनिर्माण विषय समितीने हा दौरा आयोजित केला असून त्यामध्ये काँग्रेस, माकप, मुस्लीम लीग, केरळ काँग्रेस – मणी, भाकप आणि नॅशनल सेक्युलर कॉन्फरन्सचे सदस्य सहभागी होणार आहेत.
 राज्याचे ग्रामविकासमंत्री के. सी. जोसेफ, अर्थमंत्री के. एम. मणी, नगर आणि अल्पसंख्याक कल्याणमंत्री एम. अली आणि पंचायत आणि समाजकल्याणमंत्री एम. के. मुनीर यांच्या नेतृत्वाखालील ११ सदस्यांचे पथक १२ डिसेंबर रोजी सुरतला पोहोचणार असून तेथे शहरातील सांडपाणी वाहून नेण्याच्या पद्धतीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.जोसेफ हे काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री असून मणी हे केरळमधील सत्तारूढ संयुक्त लोकशाही आघाडीतील मुख्य घटक आहेत.

Story img Loader