काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवली होती. त्यानंतर मीरारोड परिसरात सरस्वती वैद्यची तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज सानेनं निर्घृणपणे हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये लपवून ठेवले होते. आता पुन्हा एक लिव्ह-इन पार्टनर तरुणीच्या हत्येचा प्रकार उघड झाला आहे. २४ वर्षीय तरुणाने त्याच्या समवयीन लिव्ह-इन पार्टनरची कुकरने हत्या केली असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

हा सगळा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे. बंगळुरूच्या साऊथ-ईस्ट डिव्हिजनचे डीसीपी सी. के. बाबा यांनी यासंदर्भात एएनआयला माहिती दिली आहे. बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी बंगळुरूच्या बेगूर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव वैष्णव असून तरुणीचं नाव देवी आहे.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू

तीन वर्षांपासून लिव्ह-इन पार्टनर

वैष्णव व देवी हे दोघे केरळचे आहेत. ते शिकायलाही सोबतच होते. गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहात होते. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित चाललं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वैष्णवला देवीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. देवी त्याची फसवणूक करत असल्याची शंका त्याच्या मनात घर करू लागली. या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

अकोला : पत्नीच्या आत्महत्येचा केला बनाव; पण सैनिक पतीचे बिंग फुटलेच

शनिवारी संध्याकाळी त्यांच्यात याच मुद्द्यावरून झालेला वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात वैष्णवनं घरातला कूकर देवीच्या डोक्यात घातला. देवीच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. काही आप्तस्वकीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं खरं. पण प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे देवीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू

दरम्यान, मायको लेआऊट पोलीस स्थानकात यासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डीसीपी सी. के. बाबा यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणी वैष्णवला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे, असंही ते म्हणाले.

Story img Loader