Kerala Mass Muder Crime News : केरळच्या तिरुअनंतपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. २३ वर्षीय ए आर अफान याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कुटुंबातील चार जण आणि त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार केरळच्या वेंजरामूडू येथे समोर आला होता. या भयानक घटनेनंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीने एका व्यक्तीकडून १० लाख रूपये व्याजाने घेतले होते आणि त्याला कर्ज फेडण्यासाठी दिवसाला १० हजार रुपये द्यावे लागत होते.
आई थोडक्यात बचावली
अफानची आई शेमी (४७) यांच्यावर देखील आरोपीने हल्ला केला होता पण त्या थोडक्यात बचावल्या. त्यांनी त्यांचे घर गहाण ठेवून कर्ज घेतले होते जे नंतर बँकेने जप्त केले होते. कुटुंबावर एकूण ७५ लाखांचे कर्ज होते, ज्यामुळे कुटुंबात नेहमी वाद होत असत. अफानची उधळ पट्टी करण्याची सवय तसेच आखाती देशात त्याचा बंद पडलेला व्यवसाय हे आर्थिक कर्ज वाढण्याच्या कारणासाठी जबाबदार धरले जात होते.
मानसिक स्थितीचा तपास होणार
तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तज्ञ मानसोपचारतज्ज्ञांच्या गटाकडून अफानच्या मनोविकृतिसंबंधी समुपदेशन केले जाईल. तसेच या पॅनलकडून अफान हा या हत्या करताना कथित डार्क वेबच्या प्रभावाखाली होता का? याचा तपास केला जाणार आहे. “तो ड्रग्ज व्यसनी नव्हता किंवा व्यावसायिक खुनीही नव्हता. पीडित लोक हे त्याचे शत्रू नव्हते तर जवळचे नातेवाईक आणि त्याची गर्लफ्रेंड हे होते. तरीही त्याने असे भयानक कृत्य केले. तो म्हणतो की आर्थिक संकटामुळे त्याने हे केले, परंतु आपल्याला अधिक चौकशी करण्याची आवश्यकता आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकारी त्याच्या सोशल मीडिया वापर, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांचे देखील विश्लेषण करत आहेत जेणेकरून या हत्याकांडात इतर काही घटक आहेत का हे ठरवले जाऊ शकेल.
बारमध्ये जाऊन दारू प्यायला
आईच्या हत्येचा प्रयत्न केल्यानंतर अफान थेट वेंजरामूडू येथील एका हॉटेल बार मध्ये गेला, येथे त्याने १० मिनिट वेळ घालवला. येथे दोन पेग दारू प्यायल्यानंतर त्याने अर्धा लिटरची दारूची बाटलीही विकत घेतली. त्यानंतर तो त्याची आडी सलमा बीवी (९५) यांच्या घरी केली आणि त्यांची हत्या केली. त्यानंतर, त्याने आजीची सोन्याची साखळी घेतली आणि ती एका फायनाशीयल फर्ममध्ये ७४,००० रुपयांना गहाण ठेवली आणि ३८,००० रुपये खात्यात ट्रान्सफर केले. त्याच्या घरी पैसे मागण्यासाठी येऊ नयेत म्हणून अफानने गुगल पे द्वारे त्याच्या प्रत्येक कर्जदाराला २,५०० रुपये पाठवून दिले.
दरम्यान, त्याची आई श्री गोकुलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात स्थिर आहे. तिचे म्हणणे तपासात महत्त्वाचे ठरेल अशी अपेक्षा आहे, कारण ती हल्ल्यातून वाचलेली एकमेव व्यक्ती आहे. सध्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या अफानला गुरुवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे आणि तपास पथकाकडून त्याची अधिक चौकशी केली जाईल.
त्यानंतर तो त्याच्या वडिलांचे मोठा भाऊ अब्दुल लतीफ (६३) यांच्या घरी गेला, जिथे त्याने त्यांची आणि पत्नी शाहिदा बीवी (५७) यांची हत्या केली. त्याची प्रेयसी फरजाना (२१) आणि त्याचा धाकटा भाऊ अफसान (१३) हे त्याचे पुढचे लक्ष्य होते.
आत्महत्येचा प्रयत्न केला पण
या हत्या केल्यांनंतर अफानने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याची योजना केली होती. पण दोन तासानंतरही तो जिवंत राहिला आणि त्याने स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.
यादरम्यान अफानच्या आईवर श्री गोकुलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तिची तब्येत स्थिर आहे. या घटनेबाबत ती काय माहिती देणार ते महत्त्वाचे ठरणार आहे, कारण या हल्ल्यातून वाचलेली ती एकमेव व्यक्ती आहे. सध्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या अफानला गुरुवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तपास पथकाकडून त्याची अधिक चौकशी केली जाईल.