Kerala migrant worker shot dead at Jordan-Israel border: केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यामधील थुंबा येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीला जॉर्डनच्या सैनिकांनी सीमेवर गोळ्या घातल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिजा एजन्सीने फसवणूक केल्यानंतर काही दिवसांपूर्वी हा व्यक्ती इतर तीन जणांबरोबर इस्त्रायलच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान आता या व्यक्तीचा मृतदेह परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

थुंबाजवळील राजीव गांधी नगर येथील पुथुवल पुरायदमच्या थॉमस गॅब्रियल परेरा (४७) याचा या घटनेत मृत्यू झाला आहे, तर इतर जखमी झाले आहेत. मेनमकुलम येथील किनफ्रा पार्कजवळ राहणारा थॉमस याचा नातेवाईक एडिसन (४३) याला जॉर्डनमधून परत पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, इतर दोघे अद्यापही जॉर्डनच्या जेलमध्ये आहेत. जॉर्डन येथील भारतीय दुतावासाने थॉमस परेरा याच्या मृ्त्यूबद्दल त्यांच्या कुटुंबियांना इमेलच्या माध्यमातून माहिती दिली होती, मात्र इमेल पाहिला न गेल्याने ही बातमी उघड झाली नाही.

चार जणांच्या या गटाला एका अज्ञात एजन्सीने इस्रायली वर्क व्हिसा देण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यांची फसवणूक करत त्यांना जॉर्डनचा पर्यटन व्हिसा देण्यात आला. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, चौघांनी इस्रायलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि जॉर्डनच्या सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

नेमकं काय झालं?

पेपेरा आणि एडिसन यांनी ५ फेब्रुवारी रोजी जॉर्डनला गेले. तेथे उतरल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क केला आणि ते त्यांच्याबरोबर ९ फेब्रुवारीपर्यंत संपर्कात होते. त्यांनी १० फेब्रुवारी रोजी डोंगराळ भागातून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला पण जॉर्डनच्या सैनिकांना ते आढळून आहे.

परेराच्या कुटुंबियांनी नोर्का रूट्स (Norka Roots) ला पत्र लिहून मृतदेह घरी आणण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. नोर्का रूट्सचे सीईओ अजित कोलासेरी म्हणाले की, “लोक व्हिसा एजन्सीच्या फसवणुकीला बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. युक्रेन युद्धात लढण्यासाठी इतर काही नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने किनारी भागातील गावांमधील अनेक लोकांना रशियन सैन्यात भरती करण्यात आले. या एजन्सींकडे लोकांना भरती करण्यासाठी किंवा व्हिसा देण्यासाठी कदाचित वैध परवानेही नसतील. लोकांनी अशा फसवणूकीपासून सावध राहिले पाहिजे आणि राज्य पोलिसांची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.” नोर्का रुट्स हे केरळ मधील एक सरकारी संघटना आहे. ही भारताबाहेर राहणाऱ्या केरळच्या नागरिकांची मदत करते. पासपोर्ट, व्हीसी संबंधित मदत यांच्याकडून केली जाते.

परेरा आणि एडिसन हे दोघे ऑटोरीक्षा चालक आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाच्या योजनेबद्दल कोणालाही काहीही सांगितले नव्हते. “कुटुंबियांना जॉर्डनला जात असल्याबद्दल प्रवासाच्या काही तास आधी सांगणअयात आलं, पण तेव्हाही त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. त्यांना जॉर्डनला कोण घेऊन गेले आणि त्यांनी किती पैसे दिले याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. कृपया किमान त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी मदत करा.” असे एडिसन आणि परेरा यांच्या नातेवाईक असलेल्या एग्नस हेन्री यांनी सांगितले.

Story img Loader