Kerala minister Saji Cherian Statement On constitution : सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते आणि केरळचे मत्स्यव्यवसाय आणि सांस्कृतिक कार्य मंत्री साजी चेरियान यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. भारतीय संविधान हे सर्वसामान्यांची लूट व पिळवणूक करते, असं ते म्हणाले. पठाणमथिट्टा येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलं.

‘भारतीय संविधान हे अशा प्रकारे लिहील्या गेले की त्यातून सर्वसमान्यांची लूट आणि पिवळणूक करता येईल. ब्रिटीशांनी जे तयार करून ठेवलं तेच भारतीयांनी लिहीले. गेल्या ७५ वर्षात संविधानाच्या आधारे सामान्या माणसांची लूट झाली आहे. याद्वारे भारतीयांचे शोषण केले जाते”, असे वक्तव्य मंत्री साजी चेरियान यांनी केले आहे.

हेही वाचा – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, राज्यसभा खासदार म्हणून उद्या संपणार कार्यकाळ

पुढे बोलताना ते म्हणाले, ”संविधान लिहीणाऱ्यांनी यात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता सारख्या काही चांगल्या गोष्टीही लिहून ठेवल्या आहेत. मात्र, हे संविधानाचा वापर सर्वसमान्यांची लूट करण्यासाठीच करण्यात आला.

दरम्यान, मंत्री साजी चेरियान यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस आणि भाजपाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही पक्षाकडून चेरियन यांचा राजीनामा मागण्यात येत आहे. यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात येत आहे.

हा वाद वाढल्यानंतर चेरियन यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ”मी राजीनामा दिला आहे आणि तो माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी कधीही संविधानाची बदनामी केलेली नाही. एक लोकप्रतिनीधी म्हणून मी संविधानाचा आदर करतो आणि त्याची उदात्त मूल्ये जपतो. राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी मी आणि माझा पक्ष कटिबद्ध आहोत.”, असेही ते म्हणाले. चेरियन हे चेंगन्नूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत.

हेही वाचा – राजस्थानमधील दोन शेतकऱ्यांनी ३५ किमीपर्यंत केला होता उदयपूर घटनेतील आरोपींचा पाठलाग, वाचा सविस्तर…

Story img Loader