तीन वर्षांचा मुलगा ऐकत नाही या क्षुल्लक कारणावरून कोच्ची येथे एका मातेने स्वत:च्याच मुलाला अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने चिमुकल्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. केरळ सरकारनेही या घटनेची दखल घेत चिमुकल्यावरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार, अशी घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी रात्री अलुवा येथील खासगी रुग्णालयात एक व्यक्ती त्याच्या तीन वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आला. मुलगा टेबलवरून खाली पडल्याचे त्याचे म्हणणे होते. पण दुखपातीचे स्वरूप पाहता डॉक्टरांना या प्रकारावर संशय आला. तसेच चिमुरड्याला शरीरावर चटके दिल्याचे दिसत होते. त्यामुळे संशय बळावला. अखेर डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी मुलाच्या आई- वडिलांची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघड झाला. महिला ही मूळची झारखंडची आहे. मुलगा हा मस्ती करतो आणि कोणाचेही ऐकत नसल्याने तिने मुलाला बेदम मारहाण केली. मारहाणीत मुलाच्या मेंदूच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलगा सध्या कोमात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. केरळ पोलिसांनी या प्रकरणी झारखंड पोलिसांशी संपर्क साधला आहे. पीडित मुलाचे आणखी लोक नातेवाईक आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala mother beats son for disobedience 3 year old in coma