Kerala Pathanamthitta Sexual Assault Case : केरळ पोलिसांनी शनिवारी पठाणमथिट्टा लैंगिक अत्याचार प्रकरणी २० जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक अल्पवयीन आहे. या प्रकरणाच्या संदर्भात किमान चार एफआयआर नोंदवले गेले. यामध्ये दोन वर्षांच्या कालावधित पठाणमथिट्टा येथे एका अल्पवयीन मुलीवर ६४ व्यक्तींनी बलात्कार केला होता. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ही घटना उघडकीस आली तेव्हा मुलगी १८ वर्षांची होती. बाल कल्याण समितीने केलेल्या समुपदेशनादरम्यान तिने दावा केला की, १६ व्या वर्षांपासून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला. तिच्या वागण्यात लक्षणीय बदल झाल्यानंतर तिचं समुपदेशन करण्यात आलं. स्थानिक माध्यमांनुसार, ही तरुणी शाळेतील खेळाडू आहे. तिच्या लैंगिक शोषणात प्रशिक्षक, खेळाडू, वर्गमित्र आणि शेजाऱ्यांचा समावेश आहे.

मुलीवर तिच्या प्रियकराने प्रथम लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिला त्याच्या मित्रांच्या स्वाधीन केले. एका वेगळ्या बलात्कार प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या एका आरोपीचाही मुलीवर अत्याचार करण्याऱ्यांमध्ये समावेश आहे. तिच्यावर दक्षिणेकडील राज्यातील अनेक ठिकाणी, क्रीडा शिबिरांसह प्रशिक्षक, वर्गमित्र आणि स्थानिक रहिवाशांनी अत्याचार केले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान असं समजलंय की या मुलीकडे स्वतःचा फोन नव्हता. तिने तिच्या वडिलांचा फोन वापरून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सुमारे ४० जणांचे नंबर सेव्ह केले होते.

हेही वाचा >> संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा

आरोप खरे आहेत याची खात्री करण्यासाठी बाल कल्याण समितीने मानसशास्त्रज्ञाबरोबर समुपदेशनाची व्यवस्था केली आहे. हे प्रकरण असासान्य असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. या प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि फौजदारी कायद्याच्या इतर कलमांतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची दखल घेतली. X वरील एका पोस्टमध्ये अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय महिला आयोगाने केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यात चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६५ व्यक्तींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याच्या अहवालाची गंभीर दखल घेतली आहे. आयोग या जघन्य गुन्ह्याचा तीव्र निषेध करतो आणि सर्व आरोपींना तात्काळ अटक करणे, निष्पक्ष आणि कालबद्ध तपास करणे आणि पीडितेला वैद्यकीय आणि मानसिक काळजीसह आवश्यक समर्थन सुनिश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सविस्तर कारवाई केली. तीन दिवसांत अहवाल मागवला आहे.

Story img Loader