महिला प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर केरळच्या शबरीमाला मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर एक संतापजनक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दुचाक्या फोडण्याचा प्रताप खुद्द पोलिसांनीच फोडल्या आहेत. एका व्हिडीओमुळे हे समोर आले आहे.


परंपरांच्या जोखडातून मुक्त करीत महिलांना मंदिर प्रवेशाची कवाडे खुली करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे केरळातील प्रसिद्ध शबरीमाला मंदिर सध्या प्रसिद्धी झोतात आले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, आजपासून शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश खुला झाला आहे. मात्र, याला काही परंपरावाद्यांचा विरोध आहे. त्यामुळे आज दिवसभर मंदिर परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

केरळमधील विविध भागातून येथे दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मात्र, त्यासाठी भाविकांनी आपली वाहने मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा लावल्या होत्या. दरम्यान, या रस्त्यांवरुन बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या ताफ्याने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या दुचाक्यांची तोडफोड केली. हे होत असताना माध्यमांच्या कॅमेऱ्यात याचे व्हिडीओ चित्रीकरण झाले. मात्र, ते लगेचच व्हायरल झाल्याने ही बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे केरळ पोलिसांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध केला जात आहे.

Story img Loader