क्रिकेटच्या मैदानात वादग्रस्त राहिलेला भारतीय संघाचा माजी गोलंदाज श्रीशांत राजकारणाच्या मैदानात अपयशी ठरला आहे. भाजपच्या तिकीटावर केरळ विधानसभेत लढणाऱया श्रीशांतला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस नेते व विद्यमान आरोग्यमंत्री व्ही.एस.शिवकुमार यांनी श्रीशांतला राजकारणाच्या पिचवर ‘क्लिन बोल्ड’ केले आहे. इतकेच नाही तर श्रीशांत त्याच्या मतदार संघात तिसऱया स्थानावर फेकला गेला आहे.
भाजपने तिरुवअनंतपुरम मतदारसंघातून श्रीशांतला विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. श्रीशांतलाही आपल्या विजयाची खात्री होती. मात्र, काँग्रेसच्या व्ही.एस.शिवकुमार यांनी श्रीशांतचा अपेक्षाभंग केला. शिवकुमार यांनी श्रीशांतचा ११,७१० मतांनी पराभव केला. श्रीशांतला ३४,७६४ मतं मिळाली, तर शिवकुमार यांना ४६,४७४ मते मिळाली. दुसऱया क्रमांकावरील अपक्ष उमेदवार अॅड.अँथनी राजू यांना ३५,५६९ मते मिळवली.
केरळमध्ये सत्ताधारी काँग्रेसला डाव्यांचा धक्का
क्रिकेटची वाट सोडून श्रीशांतने निवडणुकीच्या तोंड्यावर मोठ्या थाटात भाजपमध्ये प्रवेश केला. श्रीशांतच्या सहभागामुळे केरळमध्ये पक्षाला चांगेल यश मिळेल असा विश्वास भाजपने व्यक्त केला होता. तर भाजपला केरळमध्ये ३५ ते ४० जागा मिळतील असा अंदाज श्रीशांत याने व्यक्त केला होता.