केरळमध्ये पावसानं धुमाकूळ घातला असून इतिहासात कधीही ओढवली नाही अशी आपत्ती ओढवली आहे. अनेक भागांना पुराच्या पाण्याने वेढले आहे असून केरळमध्ये मृतांचा आकडा वाढून 72 झाला आहे. केरळच्या १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कराने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. राष्ट्रीय आप्तकालिन बचाव दलाच्या आणखी 12 टीम केरळमध्ये रवाना करण्यात आल्या आहेत.
#KeralaFloods2018 update. Further augmenting the Rescue & Relief efforts @IndiaCoastGuard mobilized the available resources & deployed 06 teams with Gemini Boats across the flood-hit areas of #Ernakulam #Kerala this morning for helping the affected people @DefenceMinIndia pic.twitter.com/GKj4F3qxor
— PIB India (@PIB_India) August 16, 2018
Kerala: Death toll due to flooding caused by heavy and incessant rains in the state rises to 67. (File pic) pic.twitter.com/UrUMcjugc8
— ANI (@ANI) August 15, 2018
मुसळधार पावसामुळे केरळच्या इतिहासात प्रथमच ३९ पैकी ३५ धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. पूरामुळे कोची विमानतळ शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. एर्नाकुलमच्या एचआयएल कॉलनीत अडकलेल्या २३ जणांची १३ गरवाल रायफलच्या जवानांनी सुटका केली. यंदाच्या पावसाळ्यात 29 मे पासून आत्तापर्यंत तब्बल 267 जणांना पुरामुळे प्राण गमावावे लागले असून त्यातल्या 72 जणांचे बळी या पुरामध्ये गेले आहेत.
#Visuals from Kochi airport that has been shut till August 18 due to incessant rains. #Keralafloods pic.twitter.com/xtXrAbovxg
— ANI (@ANI) August 15, 2018
संपूर्ण राज्यात बचाव मोहिम सुरु असून लोकांना मदत छावण्यांमध्ये पोहोचवले जात आहे. मंजुमाला, कुमीली, पेरीयार आणि अय्यापानकोविल या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सरकारने एर्नाकुलममधील पेरीयार नदी, इडुक्की आणि थ्रिसूर येथे राहणाऱ्या लोकांना मदत छावण्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
Had a detailed discussion with Kerala CM Shri Pinarayi Vijayan regarding the unfortunate flood situation in the state. Centre stands firmly with the people of Kerala and is ready to provide any assistance needed, tweets PM Narendra Modi. (File pic) pic.twitter.com/4PfWTYnnqy
— ANI (@ANI) August 15, 2018
पावसामुळे आतापर्यंत येथे 72 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथील वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण जीवन कोलमडून गेले आहे. कोची विमानतळालगत असलेल्या पेरियार नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून कोची विमानतळ बं द ठेवण्यात आला आहे. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा चालु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोची प्रशासनाने सांगितले. पण पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्याने येथील विमानतळ प्रशासनाने शनिवारपर्यंत विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.