तुमच्या शिक्षकांना “टीचर” म्हणून संबोधित करा, “सर” किंवा “मॅडम” म्हणून नाही, असं केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले आहे. ओलासेरी गावातील सरकारी अनुदानित सीनियर बेसिक स्कूल ही शिक्षकांना संबोधित करताना लिंग तटस्थता पाळणारी राज्यातील पहिली शाळा बनली आहे. ३०० विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत नऊ महिला शिक्षक आणि आठ पुरुष शिक्षक आहेत.

अनेक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी लिंग-तटस्थ गणवेशाचा अवलंब केल्यावर हे आणखी एक पाऊल पुढे आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक, वेणुगोपालन एच यांच्या म्हणण्यानुसार, ही कल्पना प्रथम एका पुरुष कर्मचारी सदस्याने मांडली होती. “आमच्या स्टाफ सदस्यांपैकी एक, सजीव कुमार व्ही, यांनी पुरुष शिक्षकांना सर म्हणून संबोधण्याची पद्धत सोडून देण्याची कल्पना मांडली. सरकारी अधिकाऱ्यांना ‘सर’ म्हणून संबोधण्याची प्रथा दूर करण्यासाठी पलक्कडस्थित सामाजिक कार्यकर्ते बोबन मट्टुमंथा यांनी सुरू केलेल्या मोहिमेतून त्यांना प्रेरणा मिळाली.”

School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!
RTE, RTE Admission, RTE Admission Registration,
‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…
Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?
Success story of jagpal singh phogat who left teaching did honey business became businessman earned crores
“अरे मास्तर गाय पाळ, म्हैस पाळ पण…”, पालकांचा विरोध पत्करला अन् सोडली शिक्षकाची नोकरी, आता ‘हा’ व्यवसाय करून कमावतायत कोटी
ordered to conduct activities in schools for Republic Day
प्रजासत्ताक दिनाला आता उपक्रमांची जोड; शालेय शिक्षण विभागाचा आदेश

तसेच, शाळेपासून फार दूर असलेल्या पंचायतीने असेच बदल केले आहेत, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेपासून १४ किमी अंतरावर असलेल्या माथूर पंचायतीने गेल्या वर्षी जुलैमध्ये “सर” आणि “मॅडम” म्हणण्याच्या प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासकीय मंडळाने जनतेला पंचायत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदनामाने संबोधित करण्याचे निर्देश दिले होते. वेणुगोपालन म्हणाले की, पंचायतीच्या निर्णयाचा शाळेवरही परिणाम झाला. आम्ही विचार केला की शिक्षकांना संबोधित करताना लैंगिक तटस्थता आणण्यासाठी आम्ही आमच्या शाळेत हाच बदल का आणू शकत नाही. पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले.

“१ डिसेंबरपासून, आम्ही विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना, स्त्री आणि पुरुष दोघांनाही टीचर म्हणून संबोधित करण्यास सांगितले. सुरुवातीला काही काळ अवघड गेलं मात्र, विद्यार्थ्यांनी हळूहळू शिक्षकांना संबोधित करण्याची पद्धत बदलली. आता, पुरुष शिक्षकाला कोणीही ‘सर’ म्हणत नाही,” वेणुगोपालन म्हणाले. सरकारी अधिकाऱ्यांना “सर” किंवा “मॅडम” म्हणून संबोधण्याची प्रथा दूर करण्यासाठी सरकारशी संपर्क साधणारे बोबन मट्टुमंथा म्हणाले की, इतर शाळांमध्येही असेच बदल व्हायला हवेत.

‘सर’ आणि ‘मॅडम’ हे शब्द लैंगिक न्यायाच्या विरोधात आहेत. शिक्षकांना त्यांच्या पदनामाने संबोधित केले पाहिजे, त्यांच्या लिंगानुसार नाही. शिक्षकांना संबोधित करण्याचा नवीन मार्ग विद्यार्थ्यांना लैंगिक न्यायाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल. ‘सर’ हे संबोधन हे वसाहती काळातील आहे, ते दूर केले पाहिजे,’’ ते म्हणाले.

Story img Loader