केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाच्या बाथरूममध्ये द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जेएस सिद्धार्थन याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेमुळे केरळमध्ये मोठी खळबळ उडाली होती. जेएस सिद्धार्थन याला मारहाण केल्याचे पोलीस तपासातून समोर आले होते. या घटनेनंतर सात आरोपींना अटक करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेत या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविला.

जेएस सिद्धार्थन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आल्यानंतर सीबीआयने आतापर्यंत २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तसेच केरळ रॅगिंग प्रतिबंध कायद्याच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी केलेल्या तपासाचा अहवाल सीबीआयकडे सोपविण्यात आला असून या अहवालामधून जेएस सिद्धार्थन मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

हेही वाचा : “राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…”

अहवालामधून काय माहिती समोर आली?

जेएस सिद्धार्थनच्या मृत्यूपूर्वी त्याचा काही विद्यार्थ्य़ांनी तब्बल २९ तास मानसिक छळ केला. तसेच त्याला मारहाण करण्यात आली होती, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. दरम्यान, जेएस सिद्धार्थनच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर काही सहकारी विद्यार्थ्यांकडून रॅगिंग केल्याचा आरोप केला होता.

जेएस सिद्धार्थनवर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १७ फेब्रुवारीपर्यंत सतत हाताने आणि बेल्टने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामुळे तो मानसिक तणावाच्या अवस्थेत गेला आणि यातूनच आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही, असे त्याला वाटल्याने त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी वसतिगृहाच्या बाथरूममध्ये जेएस सिद्धार्थन याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे अहवालात म्हटले आहे.

या घटनेवरून पोलिसांनी सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, महाविद्यालयाच्या रॅगिंग विरोधी पथकाचा अहवाल, तसेच महाविद्यालयातील काहीजणांच्या प्रतिक्रिया, शवविच्छेदन अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब, यावरून सिद्धार्थनचा काही विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे अहवालात म्हटले आहे.