Kerala Teacher Gets 111 Years Jail Sentence : केरळमध्ये विद्यार्थीनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने १११ वर्षांचा सश्रम कारावास आणि १.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. नुकतेच तिरुअनंतपुरम येथील विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने ४४ वर्षांच्या आरोपी शिक्षकाला ही शिक्षा ठोठावली. जर या आरोपी शिक्षकाने वेळेत दंड नाही भरला तर त्याच्या तुरुंगवासात आणखी एक वर्षाची शिक्षा वाढवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती आर रेखा म्हणाल्या की, “आरोपी शिक्षक मनोजला एक मुलगी आहे. तो एका मुलीचा पालक असतानाही त्याला पीडितेची दयामाया न करता गुन्हा केला होता.”

crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
Bopapur school, Bopapur teacher suspended ,
अजबच! दोन शिक्षक मारामारी करतात आणि विद्यार्थ्यास बदडतात, अखेर निलंबित ?
anticipatory bail application of illegal school principal rejected by pune court
बेकायदा शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Retired teacher and his son got cheated for Rs 30 lakhs Accuseds bail application rejected
निवृत्त शिक्षकासह मुलाची ३० लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी

सरकारी शिक्षक असलेला आरोपी आपल्या घरी शिकवणी घ्यायचा. २ जुलै २०१९ रोजी आरोपीने मुलीला स्पेशल क्लासच्या बहाण्याने घरी बोलाविले होते. त्यावेळी ही घटना घडली होती. दरम्यान आरोपी शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती.

आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल

पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, या शिक्षकाने पीडित अल्पवयीन मुलीचे फक्त लैंगिक शोषणच केले नाही, तर त्याने त्याच्या मोबाइल फोनवर अत्याचाराची छायाचित्रेही काढली होती. या घटनेनंतर पीडित मुलीवर मोठा आघात झाला होता. ती खूप घाबरली होती. यामुळे पीडितेने आरोपीकडे शिकवणीला जाणे बंद केले होते. यानंतर आरोपीने पीडितेची प्रतिमा मलिन करण्यासाठी तिची आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल केली होती. यानंतर पीडित मुलीने तिच्या पालकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपीविरुद्ध फोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा फोन जप्त करत तपासणीसाठी पाठवला होता. त्यामध्ये पीडित मुलीवर तो अत्याचार करत असल्याचे फोटो सापडले होते. आरोपी शिक्षकाने घटना घडली त्यावेळी तो घरी नसल्याचा युक्तीवाद केला होता. मात्र, फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आरोपीच्या फोनवरून तो घटनास्थळीच होता, हे सिद्ध केले.

Story img Loader