Wayanad Landslides Update : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून या घटनेत आतापर्यंत २९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरू आहेत. याशिवाय २०० हून अधिक नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत एक हजार नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी दिली आहे.

खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या लष्कर, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. मात्र, खराब हवामान आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. याशिवाय येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी लष्कराकडून कोझिकोड येथे नियंत्रण कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे.

Home buyers cheated in Kalyan Dombivli
कल्याण, डोंबिवलीत घर खरेदीदारांची फसवणूक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
Thakurli Flyover Affected Residents, Thakurli Flyover,
ठाकुर्लीत उड्डाण पूल बाधित रहिवाशांचे विकासकाकडून पुनर्वसन

हेही वाचा – केरळमध्ये हाहाकार! वायनाडमध्ये लोकं झोपली होती तेवढ्यात निसर्गाचा प्रकोप झाला; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज केरळच्य मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीत एकूणच परिस्थितीवर चर्चा होणार आहे. केरळ सरकारने वायनाडमधील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी

दरम्यान, हवामान विभागाने माहितीनुसार, केरळच्या इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावासाची शक्यता आहे. या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पुन्हा भूस्खलनाची घटना घडू शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. केरळ सरकारकडून ९६५६९३८६८९ आणि ८०८६०१०८३३ असे दोन हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Wayanad landslides: भूस्खलनाच्या सहा महिन्यांपूर्वी किती सुंदर दिसत होते वायनाड, मुंडक्काईचे निसर्ग दर्शविणारा Video Viral

पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

मंगळवारी (३० जुलै) पहाटे मेप्पाडीच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनाच्या घटनेचा तब्बल ४ पेक्षा जास्त गावांना फटका बसला आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधून या घटनेची माहिती घेत सर्वतोपरी मदत केंद्र सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे.

मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर

या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

Story img Loader