केरळमधल्या तिरुअनंतपुरममध्ये असलेल्या कासरागोड महापालिकेने एका रस्त्याला गाझा स्ट्रीट असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता आत्ता चक्क NIA च्या अर्थात राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या रडारवर आला आहे. इस्त्रायल आणि इजिप्तमधले अनेक वादग्रस्त संदर्भ गाझा स्ट्रीटसोबत जोडले गेले आहेत हे आपल्याला ठाऊक आहेच. तसेच आयसिस या दहशतवादी संघटनेच्या अनेक कारवायांचा आणि गाझा स्ट्रीटचा संबंधही आहेच. एवढेच नाही तर केरळमधून २०१६ या वर्षात सुमारे २१ तरुण या इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे नाव का देण्यात आले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र गाझा स्ट्रीट असे नामकरण करण्यात आल्याने या रस्त्यावर आता गुप्तचर यंत्रणांची नजर असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा