अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी फ्रान्सला भेट देऊन अमेरिका गेल्या आठवडय़ातील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रेंच लोकांच्या पाठीशी आहे, असे सांगून आश्वस्त केले आहे.
केरी यांनी अमेरिकी लोकांच्या वतीने मृतांना श्रद्धांजली वाहिली. तुमचे दु:ख आम्ही समजू शकतो व काय परिस्थितीतून तुम्ही गेला असाल याची आपल्याला कल्पना आहे, असे त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवाँ ओलाँद यांना सांगितले.
या कठीण प्रसंगात आम्ही तुमच्या समवेत आहोत असे सांगून ते म्हणाले, की फ्रेंच लोक एका अभावाने झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडले आहेत. त्यामुळे त्याला तसाच प्रतिसादही असला पाहिजे. केरी यांनी दोन हल्ल्यांच्या ठिकाणी जाऊन पुष्पांजली वाहिली व नंतर ऑलांद व परराष्ट्रमंत्री लॉरेंट फेबियस यांची भेट घेतली. त्यांनी पॅरिसच्या महापौरांची भेट घेतली. ओबामा प्रशासनाने पॅरिसमधील हल्ल्यानंतर अमेरिकेचा मंत्रिपातळीवरील अधिकारी तेथे पाठवला नाही, अशी टीका झाली होती.
दरम्यान, पॅकिस येथे बॉम्बच्या अफवेने एक ट्रेन स्टेशन रिकामे करण्यात आले. दहशतवादविरोधी मोहिमेत तेथे १० जणांना अटक करण्यात आली आहे. कोशर सुपर मार्केटमधील हल्लेखोरांशी संबंधितांना पकडण्यात आले आहे. त्यांचा संबंध इस्लामिक स्टेट या संघटनेशी असल्याचे सांगण्यात आले.