Former Mahindra Group Chairman Keshub Mahindra Death : भारतातले सर्वात वयस्कर अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे काका केशब महिंद्रा यांचं वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झालं आहे. केशब महिंद्रा यांच्या निधनाची माहिती INSPACe चे अध्यक्ष पवन गोएंका यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. गोएंका यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, उद्योग जगातील सर्वात महान व्यक्तीला त्यांनी गमावलं आहे. महिंद्रा यांना भेटणं नेहमीच उत्साह वाढवणारं असतं. ते नेहमी व्यवसाय, अर्थकारण आणि सामाजिक गोष्टींची उत्तम प्रकारे सांगड घालायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोर्ब्सने जारी केलेल्या २०२३ च्या अब्जाधीश भारतीयांच्या यादीत केशव महिंद्रा यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांचं नाव १६ नव्या अब्जाधीशांच्या यादीत होतं. ते तब्बल ४८ वर्ष महिंद्रा आणि महिंद्रा समूहाच्या अध्यक्षपदी होते. २०१२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं. फोर्ब्सच्या बिलेनियर्स लिस्टनुसार केशब महिंद्रा १.२ बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती मागे ठेवून गेले आहेत.

केशब महिंद्रा यांनी पेन्सिलव्हेनिया विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. १९४७ साली ते महिंद्रा समूहाशी जोडले गेले. १९६३ मध्ये ते समूहाचे अध्यक्ष बनले. त्यांच्या नेतृत्वात महिंद्रा समूहाने नव्या उंचीवर झेप घेतली. तब्बल ४८ वर्ष महिंद्रा समूहाचं अध्यक्षपद सांभाळल्यानंतर २०१३ साली ते या पदावरून पायउतार झाले. त्यानंतर त्यांनी समूहाचा संपूर्ण कारभार त्यांचे पुतणे म्हणजेच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवला. केशब महिंद्रा यांनी टाटा स्टील, सेल, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्ससारख्या अनेक कंपन्यांच्या बोर्ड स्तरावर काम केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshub mahindra ex mahindra group chairman dies at 99 asc
Show comments