कोळसा खाणीवाटप गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील अत्यंत महत्वाची कागदपत्रे अद्याप गहाळ असून, कोळसा मंत्रालयाने सीबीआयला तपासामध्ये पुढाकार घेण्यास सांगितला. या प्रकरणी तपास यंत्रणा लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.
कोळसा खाणीवाटपाचे धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करा
कोळसा मंत्रालयाचे संचालक एस. के. शाही यांनी सोमवारी सीबीआयला लिहिलेल्या एका पत्रामध्ये या गहाळ कागदपत्रांविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये कोळसामंत्रालयाच्या बैठकांमधील नोंदी, वेगवेगळी सादरीकरणे गहाळ झाली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सीबीआयने हे प्रकरण हाताळावे असे म्हटले आहे.
कोळशाची काळी काजळी..
खाणीवाटपावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बरीच कागदपत्रे अद्याप गहाळ असून, त्या पैकी बरीच कागदपत्रे नष्ट करण्यात आल्याची भिती कोळसामंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. गहाळ कागदपत्रांच्या तपास प्रकरणी सीबीआयच्या माध्यमातून पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करणार असल्याचे कोळसामंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
सीबीआयने कोळसामंत्रालयाकडून आलेल्या पत्राला दुजोरा दिला आहे. “आम्ही उपलब्ध कागदपत्र तपासत असून, त्या पैकी अद्याप किती कागदपत्रे गहाळ झाली आहेत याचा पडताळा घेतला जाईल.” असे सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा यांनी सांगितले.

Story img Loader