रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी २०१५-१६ आर्थिक वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. मोदी सरकारचा पूर्ण वेळेसाठीचा हा पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात कोणतीही वाढ करणार नसल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे…
ठळक वैशिष्ट्ये
– रेल्वेमध्ये स्वच्छतेसाठी नवा विभाग
– स्थानके आणि रेल्वेगाड्यांना कंपन्यांची नावे देऊन निधीची उभारणी
– ज्येष्ठ नागरिकांना व्हिलचेअर ऑनलाईन आरक्षित करता येणार
– रेल्वेच्या नव्या डब्यांमध्ये ब्रेल लिपीतही सूचना लिहिल्या जाणार
– शारीरिकदृष्ट्या दुर्बल प्रवाशांना डब्यामध्ये पटकन चढता यावे, यासाठी नव्या डब्यांमध्ये दरवाजांची रुंदी वाढविणार
– रेल्वे कर्मचाऱय़ांना कामगिरीवर आधारित बोनस
– रेल्वेमध्येही सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर
– रेल्वेत नोकरीसाठी ऑनलाईन अर्जभरती
– नव्या रेल्वेगाड्यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतर घोषणा
– प्रवाशांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात विचार करणार
– रेल्वेच्या विकासासाठी ११ कलमी कार्यक्रम
– रेल्वेरूळ वाढविण्याला प्राधान्य
– रेल्वेमध्ये खासगी कंपन्यांची गुंतवणूक
– रेल्वेत बायोटॉयलेट उभारणार
– ‘अ’ श्रेणीतील सुमारे ४०० स्थानकांवर वाय-फाय सुविधा
– सर्व स्थानकांवर लॉकर उपलब्ध करून देणार
– काही रेल्वेगाड्यांमध्ये आणि लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
– मुंबईत एसी लोकल लवकरच सुरू करणार
– स्वच्छ रेल, स्वच्छ भारत हे रेल्वेचे नवे ब्रीदवाक्य
– रेल्वेडब्यांमध्ये शिडीची सोय करणार
– रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती देणारे एसएमएस अलर्ट
– प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी १८२ हा क्रमांक असलेली हेल्पलाईन
– १३८ हा क्रमांक असलेली हेल्पलाईन देशपातळीवर सुरू करणार
– खासदार निधीतून रेल्वेसाठी निधी देण्याची मागणी
– पाच मिनिटांत विनाआरक्षण तिकीट मिळणार
– रेल्वे ही राष्ट्रीय संपती आणि प्रवाशांचे धावते घर
– महिला सुरक्षेसाठी निर्भया निधीची तरतूद
– ईशान्य भारत रेल्वेचे जाळे विस्तारणार
– जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे विस्तारणार
– १०८ रेल्वेंमध्ये ई-केटरिंग सुविधा मिळणार
– दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग वाढविणार
– मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी हायस्पीड ट्रेनचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
– नऊ मार्गांवर हायस्पीड रेल्वे धावणार
– चार महिनेआधी रेल्वे आरक्षण करता येणार
– मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवर रेडिओवेव्हच्या साह्याने सूचना देण्यासाठी आयआयटी कानपूरसोबत करार
– रेल्वेतील इनोव्हेशन्ससाठी ‘कायाकल्प’ कार्यक्रम
– निवडक स्थानकांवर प्रवाशांना पिक-ड्रॉपची सुविधा
– रेल्वेडब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणार
– रेल्वेच्या सद्यस्थितीवर आधारित श्वेतपत्रिका लोकसभेत सादर करणार
– पर्यावरणासाठी रेल्वेमध्ये गुंतवणूक आवश्यक
– पुढील काळात अधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार
– रेल्वेरुळांवरील विद्युतीकरणावर भर
– रेल्वे वेळेवर धावाव्यात यादृष्टीने नियोजन
रेल्वे अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-02-2015 at 01:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Key features of railway budget 2015