पेशावरमधील लष्कराच्या शाळेवरील हल्ल्याचा कट रचणाऱया तालिबानी म्होरक्याला कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा दलाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत गुरूवारी गुंडी परिसरात सद्दाम हा पेशावर हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी ठार झाला असून त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात यश आल्याची माहिती ख्याबर एजन्सीचा राजकीय गुप्तहेर शाहब अली शाहने दिली आहे.
फोटो गॅलरी: काय घडले पेशावरमधील ‘त्या’ शाळेत?
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान(टीपीपी) या संघटनेचा दहशतवादी सद्दाम यानेच पेशावरील येथील हल्ल्यासाठी सात दहशतवाद्यांना धाडले होते. या मूठभर दहशतवाद्यांनी १६ डिसेंबर रोजी पेशावर मधील ‘आर्मी पब्लिक स्कूल’वर केलेल्या हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह १४१ जण ठार, तर सव्वाशे जण जखमी झाले होते. एखाद्या निष्ठूर क्रूरकम्र्यालाही लाजवेल अशा पद्धतीने एकेका वर्गात शिरून निरागस, निष्पाप विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या वाढत्या उपद्रवाची प्रचिती देणाऱ्या या घटनेने अवघ्या जगाला सुन्न केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा