• ६.८७ कोटी घरांमध्ये डिजिटल शिक्षण पोहोचवणार
  • शेतकऱ्यांसाठी नऊ लाख कोटींचे कर्ज
  • यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठी एकूण ८,७७,६६५ कोटींची तरतूद केली आहे.
  • स्टार्ट अप इंडियासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका दिवसात मिळणार
  • खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
  • आयकर मर्यादेत कोणताही बदल नाही, लहान करदात्यांकडे विशेष लक्ष
  • पंतप्रधान ग्राम सडक योजनेसह एकूण रस्ते विकासाकरिता ९७,००० कोटी रुपयांची तरतूद
  • उच्च शिक्षणाकरिता १,००० कोटी रुपयांची तरतूद
  • रस्ते आणि महामार्गाकरता ५५,००० कोटी रुपयांची तरतूद
  • शॉिपग मॉल २४ तास उघडे ठेवण्यासाठी परवानगी देणार
  • पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या ग्राहकांच्या करसवलतीत ३००० रुपयांची वाढ
  • छोटय़ा पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजी वाहनांवर १ टक्के प्रदूषण अधिभार
  • काही डिझेल वाहनावर २.५ टक्के तर इतर मोठय़ा वाहनांवर ४ टक्के प्रदूषण अधिभार
  • चांदीव्यतिरिक्त इतर दागिन्यांवर १ टक्का उत्पादन शुल्क लागू
  • सर्वच सेवांवर ०.५ टक्के कृषी कल्याण अधिभार लागू
  • मे २०१८ पर्यंत देशातील सर्व गावागावांत वीज पोहोचवणार
  • प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपयांचे विमा संरक्षण, ज्येष्ठ नागरिकांना १ लाख ४० हजारांचा विमा
  • मनरेगासाठी ३८,५०० कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद
  • बुडीत कर्जामुळे गोत्यात आलेल्या बँकांसाठी २५ हजार कोटी रुपये
  • रस्ते आणि रेल्वेच्या विकासासाठी दोन लाख १८ हजार कोटी खर्च करणार
  • वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुण उद्योजकांना संधी देणार
  • पंतप्रधान जनऔषधी योजनेअंतर्गत जनरिक तीन हजार औषध दुकाने सुरू करणार
  • वापरात नसलेले देशभरातील १६० विमानतळ पुन्हा सुरू करणार
  • सार्वजनिक वाहतुकीमध्ये जुने परमिट मोडीत काढणार
  • रस्ते आणि महामार्गासाठी ५५ हजार कोटी
  • सर्व जिल्हय़ात डायलिसिस केंद्र उभारणार
  • स्किल डेव्हलपमेंट स्कीमसाठी १७०० कोटींची तरतूद
  • सर्व शिक्षा अभियानअंतर्गत आणखी ६२ नवोदय विद्यालये उघडणार
  • स्टॅण्ड अप इंडियासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद
  • प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांचा विमा कव्हर, ज्येष्ठ नागरिकांना ४० हजार अधिक.
  • कराची चुकीची माहिती देणाऱ्याला २०० टक्के दंड आकारणार
  • करविवाद सोडविण्यासाठी ११ नवीन लवाद सुरू करणार
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मागे सरकार उभे
  • ६० स्क्वेअर मीटर घर बांधणाऱ्यांना सेवाकरातून सूट
  • तंबाखूवर दोन टक्के अधिक उत्पादन शुल्क
  • तंबाखू, सिगारेट, विडी महाग
  • १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाडय़ा महाग
  • सरचार्ज १२.५ टक्क्यांवरून १५ टक्के
  • डिझेल मोटारींवर २.५ टक्के सेस
  • एक कोटी रुपये कमाई असणाऱ्यांच्या सरचार्जमध्ये तीन टक्के वाढ
  • तीन वर्षांत एक कोटी तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
  • ६२ नवीन नवोदये विद्यालये सुरू
  • राष्ट्रीय ग्रामस्वराज योजनेतून गावांचा विकास
  • सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस सुविधा
  • नवीन उद्योगांना व लघुउद्योगांना कॉर्पोरेट करात सवलत