रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी लोकसभेत २०१६-१७ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ न करता सर्व सामान्यांना प्रभूंनी दिलासा दिलाच पण यासोबतच कोणत्याही मोठ्या घोषणा न करता मागील रेल्वे अर्थसंकल्पाप्रमाणेच पायाभूत सुविधांच्या सुधारणांवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे-
आणखी वाचा
- फक्त भाडे वाढवून उत्पन्न वाढणार नाही. इतर उत्पन्नाचेही स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न
- यंदा रेल्वेत गुंतवणूक दुपटीने वाढवणार.
- २०२० पर्यंत स्वयंचलित रेल्वेफाटक करण्याचे लक्ष्य.
- पॅसेंजर गाड्यांचा वेग ताशी ८० किमी करण्यावर भर.
- सध्या दररोज १३ किमीचा रेल्वेमार्ग तयार केला जातोय.
- कामात पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार.
- रेल्वेचे पूर्ण विद्युतीकरण करण्यावर भर.
- श्रीनगरला रेल्वेमार्गांनी जोडण्याचे काम लवकरच पूर्ण करणार.
- वाराणसी ते दिल्ली नवी रेल्वेसेवा सुरू होणार.
- ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशात रेल्वेचे दोन कारखाने सुरू करणार.
- आता जनरल बोगीमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा.
- दोन वर्षांत ४०० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा.
- ई-तिकीट दोन मिनिटात २ हजार ऐवजी ७ हजार काढता येणार.
- महिलांच्या २४ तास सुरक्षेसाठी सक्षम हेल्पलाईन.
- तिकीटाच्या रांगा कमी करण्यासाठी प्रयत्न करणार.
- वडोदरा रेल्वे विश्व विद्यालयाची स्थापना करणार.
- येत्या काळात सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रयत्नशील.
- ४०० स्थानकांचा विकास पीपीपी तत्त्वावर करणार.
- आर्थिक मंदीतही रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न.
- कचरा दिसल्यास तातडीने बोगीची स्वच्छता करण्याची मागणी करता येणार.
- स्थानिक खाद्य पदार्थ हवे असल्यास मोठ्या स्थानकांवर ते उपलब्ध होणार.
- प्लॅटफॉर्मच्या कुलीला यापुढे सहाय्यक म्हणून संबोधण्यात येणार.
- चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेलसाठी ‘एलिव्हेटेड कोरिडोअर’ला प्राधान्य.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात, सुरेश प्रभूंची लोकसभेत माहिती.
- सामान्यांसाठी अनारक्षित गाड्या सुरू करणार.
- मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांची उंची वाढवणार.
- रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरवता येण्याची सुविधा उपलब्ध होणार.
- रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करणार.
- डब्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभ्यास करून सुधारणेवर भर.
- १ लाख २१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य.
- तीर्थस्थळ स्थानकांवरील सुविधा अधिक संपन्न करणार.
- रेल्वे ट्रॅकवरील आंदोलनांमुळे रेल्वेचे मोठे नुकसान.
- चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्गाच्या कामाला तातडीने सुरूवात
- ताशी १३० किमी वेगाची तेजस रेल्वे सुरू होणार.
- गाड्यांमधून मलमूत्र विसर्जन थांबवणार.
- जेवणाची सोय असलेली ‘हमसफर’ रेल्वे सुरू करणार.
- रेल्वेच्या प्रवासी दरात कोणतीही वाढ नाही.