Khaleda Zia To be Out Soon : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून त्यांची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. दरम्यान, त्यांनी बांगलादेशातून पलायन केल्यानंतर त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या खालिदा झिया यांना ताबडतोब तुरुंगात मुक्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचं लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी सांगतिलं.

दोनवेळा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिलेल्या ७८ वर्षीय खालिदा झिया यांच प्रकृती सध्या नाजूक आहे. २०१८ साली त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख आणि बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी पक्षासह अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते यांची राष्ट्रपतींबरोबर बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पत्रकार संघाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की शहाबुद्दीन यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत “बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांना ताबडतोब मुक्त करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला”.

Narendra Modi in jharkhand
“झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
Prime Minister Narendra Modi said efforts to strengthen relations between India and Brunei
ब्रुनेईबरोबर संबंध दृढ करण्याचे प्रयत्न; पंतप्रधान मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore MArathi News
कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान
Loksatta anvyarth Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden on Bangladesh issue
अन्वयार्थ: गोंधळ, गोंधळी यांना थारा नकोच!
pm modi pakistan visit
नेहरू ते मोदी; कोणकोणत्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली? तेव्हा नक्की काय घडले? पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारतील का?

हेही वाचा >> Bangladesh PM Sheikh Hasina : २५ वर्षांपासून सत्तेवर, आर्थिक क्रांतीही घडवली; तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोण?

खलिदा झिया यांच्यावर काय आरोप होते?

शेख हसीना आणि खालिदा झिया यांच्यात दीर्घकालीन शत्रूत्व आहे. अधिकारांचा गैरवापर करून खालिदा झिया यांनी अनाथाश्रमाच्या ट्रस्टसाठी देणग्यांमध्ये अडीच लाख डॉलरचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आहे. बीएनपीने असे म्हटले आहे की हे खटले बनावट आहेत आणि झिया यांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा उद्देश आहेत. परंतु, शेख हसीना सरकारने आरोप नाकारले. “विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व लोकांना मुक्त करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे,” असे अध्यक्षांच्या निवेदनात म्हटले आहे.

बांगलादेशात १९९१ साली पहिल्या मुक्त वातावरणातील निवडणुका पार पडल्या. त्यावेळी खलिदा झिया या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्या सध्या देशाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत. पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला होता. तर, त्यानंतर १९९६ साली झालेल्या निवडणुकीत शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.

शेख हसीना पायउतार, पुन्हा झियांकडे नेतृत्व

बांगलादेशी जनतेनं आलटून-पालटून सत्ता देण्याचा क्रम कायम राखला. २००१ साली झालेल्या निवडणुकांमध्ये शेख हसीना यांचा पराभव झाला. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी पुन्हा सत्तेत आली. खलेदा झिया यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एका महिला पंतप्रधानाने तिसऱ्यांदा आपला कार्यकाळ पूर्ण केला.