खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. कॅनडातील गुरूद्वारा परिसरात दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हरदीप सिंग निज्जर याच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर निज्जरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४६ वर्षीय हरदीप सिंग निज्जर या मूळचा जालंधरमधील भरसिंगपुरा येथील रहिवाशी आहे. पण, अनेक वर्षापासून तो कॅनडात राहत होता. पंजाबमधील अनेक हिंदू नेत्यांच्या हत्येमागे हरदीप सिंग निज्जरचा हात होता. भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना हत्यारे आणि पैसे पुरवण्याचं काम निज्जर करत असे.

हेही वाचा : …आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक स्वत: बुलेटप्रूफ जॅकेट घालून उतरले रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं?

निज्जर सोशल मीडियावरही सक्रिय होता. तरुणांनी खलिस्तान समर्थनार्थ चळवळीला जोडण्यासाठी निज्जर व्हिडीओ आणि ऑडिओ सोशल मीडियावर शेअर करत असायचा. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( एनआयए ) निज्जरवर १० लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केले होते.

हेही वाचा : भगवान हनुमानाबद्दलची सोशल पोस्ट प्रचंड धक्कादायक; दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना २०१८ साली मोस्ट वाँन्टेड गुन्हेगारांची यादी दिली होती. त्यामध्ये हरदीप सिंग निज्जर याचाही समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khalistan tiger force chief hardeep singh nijjar shot dead in canada ssa