भारतीय सुरक्षा यंत्रणांनी खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत नवी माहिती मिळवली आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांविषयी तयार करण्यात आलेल्या दस्तावेजाता अनेक दहशतवाद्यांची नावं आहेत. हे सगळे खलिस्तानी दहशतवादी भारताच्या विरोधात कारवाया करत असल्याचं समोर आलं आहे. या दस्तावेजात सुरक्षा यंत्रणांनी गुरुपतवंत सिंग पन्नूचं नावही समाविष्ट केलं आहे. भारताचे अनेक तुकडे पन्नूला करायचे आहेत अशी माहिती एनआयच्या सूत्रांनी दिली आहे.
NIA च्या दस्तावेजात काय माहिती?
दस्तावेजात दिलेल्या माहितीनुसार पन्नूवर १६ केसेस दाखल आहेत. ही प्रकरणं दिल्ली, पंदाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंड या ठिकाणी हे गुन्हे आहेत. १९४७ मध्ये पन्नू पाकिस्तानातल्या खानाकोट गावातून अमृतसरला आला होता. त्याने पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ भगवंत सिंग हा विदेशात राहतो. अमेरिकेतल्या फुटिरतावादी शिख ग्रुपचा तो प्रमुख आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकदा भारताचे तुकडे करणार असल्याची भाषा केली आहे.
भारताच्या गृह मंत्रालयाने पन्नू सिंगला केलं दहशतवादी घोषित
७ जुलै २०२२ रोजी भारताच्या गृहमंत्रालयाने पन्नू सिंगला दहशतवादी घोषित केलं. दस्तावेजातल्या माहितीनुसार पन्नू सिंगला भारताचे तुकडे तुकडे करायचेे आहेत आणि छोट्या राज्यांऐवजी छोटे देशांची निर्मिती करायची आहे. धर्माच्या आधारावर हे विभाजन झालं पाहिजे अशी त्याची मागणी आहे. त्याला एक मुस्लिम राष्ट्र तयार करायचं आहे, त्याचं नाव त्याला डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ उर्दूस्तान असं ठेवायचं आहे. काश्मीर भारतापासून वेगळं करण्यासाठीही त्याचे प्रयत्न सुरु आहेत.
पन्नू सिंग हा अनेकदा भारतात व्हॉईस मेसेज पाठवत असतो. भारताच्या एकतेला त्याने अनेकदा आव्हान दिलं आहे. दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल आणि हरयाणा या राज्यांमध्ये त्याने खलिस्तानी पोस्टर्स आणि झेंडे दाखवण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. भारतातल्या विविध राज्यांमधून त्याच्या हस्तकांना अटक करण्यात आली आहे.