मुंबई अंडरवर्ल्ड हा नेहमीच फक्त मुंबईकरच नाही तर तमाम भारतीयांसाठी चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय राहिला. मुंबई अंडरवर्ल्डमधील बरेच कुख्यात गँगस्टर्स हे इतर राज्यांमधून मुंबईत आले होते. त्यामुळे देशभर अंडरवर्ल्डचे कनेक्शन्स होतेच. ९० च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडलं आणि ही चर्चा काहीशी विरळ झाली. मात्र, अजूनही अंडरवर्ल्डबाबतचं गूढ कायम आहे. हा अंडरवर्ल्डचा इतिहास आपल्यावरील गुन्ह्यांच्या स्वरूपात अजूनही वागवणारे काही कुख्यात गँगस्टर्स देशातील वेगवेगळ्या तुरुंगांत शिक्षा भोगत आहेत. त्यातलाच एक म्हणजे खान मुबारक याचा नुकताच उत्तर प्रदेशमध्ये मृत्यू झाल आहे.

छोटा राजनचा हिटमॅन!

खाब मुबारक हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी शार्पशूटर किंवा हिटमॅन म्हणू काम करायचा. अनेकांच्या सुपाऱ्या छोटा राजननं खान मुबारकच्याच भरवशावर घेतल्या होत्या. त्यामुळेच खान मुबारकवर आत्तापर्यंत हत्या, सशस्त्र लुटमार आणि दरोड्यांचे तब्बल ४४ गुन्हे दाखल होते. एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी जारी केलेल्या ३१ अट्टल गुन्हेगारांच्या यादीत खान मुबारकचा समावेश होता. छोटा राजनबरोबरच त्याचा मोठा भाऊ झफर सुपारी याच्यासाठीही खान मुबारकनं काम केल्याची माहिती स्पेशल टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

२००६ मधील दोन हत्यांमुळे खान मुबारक चर्चेत

२००६ मध्ये खान मुबारकनं मुंबईत चक्क पोलीस कोठडीतल्या दोन व्यक्तींची हत्या केली. या दोघांना गोळ्या घालून खान मुबारकनं ठार केलं. काला घोडा परिसरातील पोलीस चौकीत हा प्रकार घडला. या दोन्ही व्यक्ती पोलीस व्हॅनमध्ये असताना त्यांच्यावर खाननं गोळ्या झाडल्या. तेव्हापासून तो चर्चेत आला. खानला सर्वप्रथम २००७ मध्ये एक कॅशव्हॅन लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पाच वर्षं तुरुंगात काढल्यानंतर तो २०१२ मध्ये बाहेर आला. पुढच्या दोन वर्षांत किमान दोन हत्या आणि डझनभर खंडणीच्या प्रकरणात त्याचं नाव समोर आलं.

बसप नेत्याच्या हत्येचा प्रयत्न

२०१७मध्ये खान मुबारकला बसप नेते झरगाम मेहदी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक झाली. मेहदी यांच्यावर तब्बल ९ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पण या हल्ल्यातून ते बचावले. अवघ्या वर्षभरात मेहदी यांच्यावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला झाला. यावेळी मात्र त्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला.

फिल्मी शूटिंगचा सीन!

२०१७मध्ये खान मुबारकला मेहदी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या आधी त्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. चित्रपटात ज्याप्रमाणे खलनायक लोकांच्या डोक्यावर सफरचंद ठेवून ते गोळीनं उडवण्याची दृश्य दाखवतात, त्याचप्रमाणे खान मुबारकही लोकांच्या डोक्यावर सफरचंद ठेवून ती गोळीनं उडवत असतानाचे हे व्हिडीओ होते!