दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर बिहारच्या पाटण्यात जिल्हा प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही कोचिंग सेंटरवर कारवाई केली आहे. यामध्ये खान सर यांच्या कोचिंग सेंटरचादेखील समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने खास सर यांच्या कोचिंग सेंटरला टाळ लावलं आहे. महत्त्वाचे म्हणजे ही कारवाई केवळ एका दिवसांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खान सर यांच्या कोचिंग सेंटरकडून नियमांचं उल्लंघन
पाटण्याचे विभागीय उपायुक्त श्रीकांत खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खान सर यांच्या कोचिंगमध्ये व्हेंटिलेशनसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे पुढे आलं आहे. तसेच आपात्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचीदेखील व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आलं आहे. याशिवाय खान सर यांच्या कोचिंग सेंटरकडून फायर सेफ्टी नॉर्मचंदेखील उल्लंघन होत असून बिहार कोचिंग रेग्युलेशन कायद्याचं पालन होत नसल्याचे श्रीकांत खांडेकर यांनी सांगितलं आहे.
कमतरता दूर करण्याचा अधिकाऱ्यांना दिला विश्वास
या कारवाईनंतर खान सर यांनीही आपण सर्व कमतरता दूर करून जिल्हा प्रशासनाच्या नोटिशीला एक-दोन दिवसांत उत्तर देऊ, असा विश्वास अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.
पाटणा जिल्हा प्रशासनाकडून कोचिंग सेंटरवर कारवाई
दिल्लीतील घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पाटणा जिल्हा प्रशासनाने मंगळवापासून शहरातील सर्व कोचिंग सेंटरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जवळपास तीन हजार कोचिंग सेंटरचा समावेश आहे. यासाठी सहा जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने आतापर्यंत ३० कोचिंग सेंटरवर कारवाई केली आहे. यामध्ये खान सर यांच्या दोन कोचिंग सेंटरचा समावेश आहे.
यापूर्वी विकास दिव्यकीर्ती यांच्या दृष्टी आयएएसवरही कारवाई
दरम्यान, यापूर्वी दोन दिवसांपूर्वी दिल्ली सरकारनेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही कोचिंग सेंटरवर कारवाई केली होती. यामध्ये प्रसिद्ध शिक्षक विकास दिव्यकीर्ती यांच्या दृष्टी आयएएस या कोचिंग सेंटरचादेखील समावेश होता. नेहरू विहारमधील वर्धमान मॉलच्या तळघरातील त्यांचे कोचिंग सेंटर सुरक्षेच्या कारणास्तव सील करण्यात आलं होते.
दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू
तीन दिवसांपूर्वी दिल्लीत मुसळधार पाऊस झाला. दिल्लीतल्या अनेक भागात पावसाचं पाणी साचलं होतं. राजेंद्र नगर भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. दरम्यान, राजेंद्र नगर येथील Rau’s आयएएस इन्स्टिट्युटमच्या तळघरात पाणी शिरलं. येथे यूपीएससीचे शिकवणी वर्ग चालू होते. मात्र या वर्गाच्या बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा होता जो बायोमेट्रिक पद्धतीने उघडता येत होता. मात्र तळघरात पाणी शिरल्यानंतर हा दरवाजा उघडता येत नसल्याने अनेक विद्यार्थी आत अडकले. यापैकी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.