यूपीए-२ सरकारच्या बहुदा शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोमवारी एकूण आठ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ घेतली. आठपैकी चार जणांना कॅबिनेट मंत्रिपद तर उर्वरित चार जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. 
सिसराम ओला, ऑस्कर फर्नांडिस, गिरीजा व्यास आणि के. एस. राव यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातील माणिकराव गावित यांच्यासह संतोष चौधरी, जे. डी सेलम आणि ई.एम.एस. नाचिप्पन यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
ओला यांच्याकडे कामगार, फर्नांडिस यांच्याकडे रस्ते आणि महामार्ग विकास, गिरिजा व्यास यांच्याकडे गृहनिर्माण, नगरविकास आणि राव यांच्याकडे वस्त्रोद्योग खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या गावित यांच्याकडे सामाजिक न्याय खाते देण्यात आले आहे. आधीपासून मंत्रिमंडळात असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे रेल्वे खाते देण्यात आले आहे.
शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा