भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची बुधवारी भेट घेऊन देपसांग खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीबद्दल त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. उभयतांची सुमारे दोन तास चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वर्षी उभय देशांचे नेते भेटीची तयारी करीत असून या घडीला भारत-चीन संबंधांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असल्याचे प्रतिपादन वांग यी यांनी केले.

Story img Loader