पीटीआय, लॉस एंजेलिस : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या शीख कुटुंबाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांमध्ये ८ महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. या घटनेनंतर पंजाबमधील त्यांच्या मूळ गावी संतापाची भावना व्यक्त होत असून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही सखोल चौकशीची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॅलिफोर्नियाच्या मर्सेड काऊंटीमध्ये नव्याने ट्रकच्या व्यवसायात उतरलेले जसदीप सिंग, त्यांचे मोठे बंधू अमरदीप सिंग, जसदीप यांची पत्नी जसलीन कौर आणि ८ महिन्यांचे बाळ आरुही यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांचा शोध सुरू असताना गुरुवारी जवळच असलेल्या फळबागेमध्ये चौघांचे मृतदेह आढळून आले. अपहरणाची सीसीटीव्ही चित्रफीत पोलिसांच्या हाती लागली असून पैशांसाठी त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपहृतांपैकी एकाचे एटीएम कार्ड अपहरणाच्या घटनेनंतर वापरण्यात आले होते. सिंग कुटुंबीयांनी मात्र आपल्या कार्यालयातून कसलीही चोरी झाली नसल्याचे म्हटल्यामुळे हत्येच्या कारणाबाबत संशय बळावला आहे. पोलिसांनी आरोपी जिजस मॅन्युअल सल्गाडो याला यापूर्वीच अटक केली असून आत्महत्येच्या प्रयत्नात जखमी झाल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चौकशीची मागणी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या घटनेबाबत तीव्र संतापाची भावना व्यक्त केली. केंद्र सरकारने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यास सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहनही मान यांनी केले.