उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना पत्र पाठवलं आहे. दुसऱ्या महायुद्धात मिळवलेल्या विजयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किम जोंग उन यांनी हे पत्र पाठवले आहे. किम जोंग उन यांनी या पत्रातून दुसऱ्या महायुद्धातील विजयासाठी रशिया आणि पुतिन यांचे अभिनंदन केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘करोना व्हायरस विरुद्धच्या लढाईतही रशियाला असेच यश मिळो’, असे किम यांनी या पत्रात म्हटले आहे. पुतिन यांच्याआधी किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना कौतुकाचे पत्र पाठवले होते. करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्याबद्दल जिनपिंग यांचे त्यांनी कौतुक केले होते.

चीन हा उत्तर कोरियाचा अत्यंत जवळचा, भरवशाचा मित्र आहे. उत्तर कोरियाचा व्यापार चीनवर अवलंबून आहे. चीन ही एकप्रकारे उत्तर कोरियाची लाइफलाइनच आहे. त्यांचा ९० टक्के व्यापार चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे चीन बरोबर पुन्हा व्यापार सुरु करण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्नशील आहे असे तज्ज्ञांनी सांगितले. करोना व्हायरसमुळे मागच्या काही महिन्यात चीन आणि उत्तर कोरियामधील व्यापार मोठया प्रमाणावर कमी झाला होता.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kim jong un sends putin letter in outreach amid coronavirus crisis dmp