किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग झाल्याची माहिती ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींसंदर्भात तक्रार होती. त्याची तपासणी करताना त्यांना कर्करोग झाल्याचं समजलं आहे. कर्करोग आणि प्रोटेस्ट ग्रंथींशी संबंधित नाही. किंग चार्ल्स यांना शरीराच्या कुठल्या भागात कर्करोग आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र आता त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
किंग चार्ल्स यांची प्रकृती कशी आहे
किंग चार्ल्स तृतीय यांची प्रकृती चांगली आहे. लवकरच ते राजकीय कामकाज पुन्हा सुरु करतील. सध्या काही काळ ते राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. त्यांच्या जागी राजघराण्याचे इतर ज्येष्ठ सदस्य त्यांच्या वतीने कर्तव्य पूर्ण करतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच किंग चार्ल्स तृतीय यांना बरं होण्यासाठी किती कालावधी लागेल हे जाहीर करण्यात आलेलं नाही. किंग चार्ल्स तृतीय हे ७५ वर्षांचे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही. त्यांच्यावर आऊटडोअर पेशंट म्हणून उपचार सुरु आहेत.
हे पण वाचा किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी घोडा उधळून थेट प्रेक्षकांकडे धावू लागला मग… Video पाहून व्हाल थक्क
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं २०२२ मध्ये निधन झालं. त्यानंतर त्यांच्या सिंहासनावर आरूढ होण्याचा मान किंग चार्ल्स थ्री यांना मिळाला. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. किंग चार्ल्स थ्री यांच्या रूपाने आता ब्रिटनला नवा सम्राट मिळाला. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात किंग चार्ल्स ३ यांना ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून घोषित करण्यात आलं होतं. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या सर्वाधिक काळी ब्रिटनच्या महाराणीपदी राहिल्या. १९५२ ते २०२२ अशी ७० वर्षांची त्यांची राणी म्हणून कारकीर्द ही सर्वात प्रदीर्घ कारकीर्द ठरली.