सुधारित लोकपाल विधेयक हा निव्वळ एक फार्स असल्याची टीका अण्णा हजारे यांनी गुरुवारी केली होती. मात्र, त्यांच्याच टीममधील प्रमुख सदस्य असलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सुधारित लोकपाल विधेयकाला शुक्रवारी पाठिंबा दिला. यानिमित्ताने नव्या टीमअण्णामध्येही मतभेद असल्याचे दिसून आले आहे.
लोकपाल विधेयकाबद्दल आम्ही उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन नव्या विधेयकात झाले असल्याचे बेदी यांनी म्हटले आहे. सीबीआयच्या प्रमुखांची निवड करण्यासाठी नव्या विधेयकात केलेल्या तरतुदींचेही त्यांनी स्वागत केले.
अगदीच काही नाही इथपासून काहीतरी आणि आता अपेक्षापेक्षा जास्त असा आमचा प्रवास झालाय. या पद्धतीने सुधारित लोकपाल विधेयकाकडे बघावे लागले, या शब्दांत बेदी यांनी ट्विट केलंय.
सीबीआयचा भ्रष्टाचारविरोधी विभाग नव्या विधेयकात लोकपालाच्या कार्यकक्षेत आणण्यात आला आहे. याचीच आम्ही मागणी करीत होतो, असेही त्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे विधेयकात आणखी सुधारणा सुचवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली.
किरण बेदी यांनी खालीलप्रमाणे ट्विट केले आहे…
@thekiranbedi From nothing to something to more as we move on! This is how we can read the lokpal bill! Unless we want to stay at nothing!

Story img Loader