दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे घमासान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी त्यांचे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत कृष्णानगर मतदार संघातील आपल्या निवडणूक कार्यालयाच्या मालकाला धमकी दिली जात असल्याची माहिती किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. कार्यालयात बॉम्ब ठेवून जीवे मारण्याची धमकी घर मालकाला दिली जात असून कार्यालयातून भाजपवाल्यांना हाकलून लावण्यास सांगितले जात असल्याची माहिती बेदींनी दिली आहे.
किरण बेदींच्या कार्यालयावर हल्ला!
सोमवारी कृष्णानगरमधील याच कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली होती. ही तोडफोड वकिलांच्या एका गटाने केल्याचे उपस्थित भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader